मुख्यमंत्र्यांबद्दल नारायण राणेंनी केलेल्या विधानाचे पुण्यात पडसाद

आंदोलनाबरोबरच आर.डेक्कन मॉलवर फेकला दगड
narayan rane
narayan rane sakal
Updated on

पुणे : केंद्रीय सूक्ष्म व लघु उद्योग मंत्री नारायण राणे (narayan rane) यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे ( Uddhav thackeray) यांच्याबद्दल केलेल्या आक्षेपार्ह विधानाचे मंगळवारी सकाळपासूनच शहरात पडसाद उमटण्यास सुरुवात झाली. शिवसेनेकडून (shivsena) चतु:शृंगी पोलिस ठाण्यात राणे यांच्याविरुद्ध तक्रार दाखल करण्यापासून ते गुडलक हॉटेलजवळच्या चौकात आंदोलन आणि त्यानंतर आर डेक्कन मॉल येथे एकाने तरुणाकडुन दगड मारण्याच्या घटना घडल्या. दरम्यान, भाजपाच्या जंगली महाराज रस्ता येथील कार्यालयाबाहेर तत्काळ पोलिस बंदोबस्त ठेवण्यात आला.

नारायण राणे यांनी सोमवारी झालेल्या एका पत्रकार परिषदेत मुख्यमंत्री ठाकरे यांच्याबद्दल आक्षेपार्ह विधान केले होते. त्याविरुद्ध युवासेनेचे कोथरुड विभागाचे सरचिटणीस रोहित रमेश कदम (वय 29, रा. पाषाण) यांनी चतु:शुंगी पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. त्यानंतर पुणे पोलिसांचे एक पथक

narayan rane
राणेंच्या विरोधात शिवसैनिकांचे कोंबड्या उडवीत चप्पल मारो आंदोलन

राणे यांची चौकशी करण्यासाठी चिपळूणला रवाना झाले.

दरम्यान, या घटनेच्या निषेधार्थ शिवसेनेच्यावतीने फर्ग्युसन महाविद्यालय रस्त्यावरील गुडलक हॉटेलजवळच्या चौकात मंगळवारी सकाळी साडे अकरा वाजता आंदोलन करण्यात आले. यावेळी वरिष्ठ पोलिस अधिकारी तेथे हजर होते.आंदोलनात घोषणाबाजी झाल्यानंतर आंदोलक निघुन गेले. त्याचवेळी नारायण राणे यांच्या डेक्कन येथील आर.डेक्कन या मॉलवर एका तरुणाने दगड फेकून मारला. त्यामध्ये मॉलच्या काचेला तडा गेला. दरम्यान, शिवसेना कार्यकर्ते आक्रमक झाल्याने भाजपाच्या जंगली महाराज रस्ता येथील कार्यालयाबाहेर तत्काळ पोलिस बंदोबस्त ठेवण्यात आला.

narayan rane
त्या वक्तव्यासाठी नारायण राणेंच्या पाठीशी भाजप नाही- फडणवीस

राणे यांचा पुतळा जाळत, नगर पुणे हायवे अडवला

राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याबद्दल केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी केलेल्या आक्षेपार्ह विधानाचा निषेध व्यक्त करीत राणेंच्या प्रतिकात्मक पुतळ्याचे दहन करत पुणे जिल्ह्याचे शिवसेनेचे जिल्हाप्रमुख ज्ञानेश्वर कटके यांच्या मार्गदर्शनाखाली वाघोलीतील शिवसैनिकांनी नारायण राणे यांच्या पुतळ्याचे दहन करत त्यांच्या विरोधात घोषणाबाजी केली यामुळे पुणे नगर रोड महामार्गावर वाहतूक कोंडी झाली होती लोणीकंद पोलिसांनी याची त्वरित दखल घेऊन ही वाहतूक कोंडी सुरळीत केली व शिवसेनेच्या वतीने लोणीकंदचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक गजानन पवार यांना निवेदन देण्यात आले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.