Pune: नारायणगावला जागतिक बँकेच्या आर्थिक मदत व शिवतेज कंपनीच्या माध्यमातून सुमारे पाच कोटीचा शेतकऱ्यांसाठी प्रकल्प...

महाराष्ट्र बँकेने ९१ लाख रुपयांचा कर्ज पुरवठा केला.
Narayangao News
Narayangao Newssakal
Updated on

Narayangao News - नारायणगाव परिसरातील तरुण द्राक्ष उत्पादक शेतकऱ्यांनी एकत्र येऊन शिवतेज शेतकरी उत्पादक कंपनी स्थापन केली आहे.

जागतिक बँकेच्या आर्थिक मदत व शिवतेज कंपनीच्या माध्यमातून सुमारे पाच कोटी रुपये खर्च करून नारायणगाव येथे शीतगृह व पॅक हाऊस प्रकल्प उभारण्याचा निर्णय घेतला आहे. हा प्रकल्प शेतकऱ्यांच्या दृष्टीने प्रगतीचे व आर्थिक उन्नतीचे साधन ठरेल. असा विश्वास आमदार अतुल बेनके यांनी व्यक्त केला.

बाळासाहेब ठाकरे  कृषी व्यावसाय व ग्रामीण परीवर्तन  प्रकल्पा (स्मार्ट)अंतर्गत नारायणगाव येथील तरुण द्राक्ष उत्पादक शेतकऱ्यांनी एकत्र येऊन  सुरू केलेल्या  शिवतेज शेतकरी उत्पादक कंपनीला शीतगृह व पॅक हाऊस उभारणीसाठी मंजुरी मिळाली आहे. जागतिक बँकेच्या आर्थिक मदती मधून उभारण्यात येणारा हा उत्तर पुणे जिल्ह्यातील पहिलाच पथदर्शी प्रकल्प आहे.

हा प्रकल्प उभारणी साठी सुमारे पाच कोटी रुपये खर्च येणार असून स्मार्ट अंतर्गत शीतगृह व पॅक हाऊस उभारणीसाठी तीन कोटी रुपयांचे (६० टक्के) अनुदान मंजूर झाले आहे.या प्रकल्पासाठी महाराष्ट्र बँकेने ९१ लाख रुपयांचा कर्ज पुरवठा केला आहे.

Narayangao News
Ajit Pawar News : प्रत्युत्तरच नव्हे तर शक्तिप्रदर्शनही! बीडमध्ये शरद पवारांच्या सभेनंतर अजित पवारांची जोरदार तयारी

हा प्रकल्प उभारण्यासाठी शिवतेज शेतकरी उत्पादक कंपनीच्या माध्यमातून सतरा द्राक्ष उत्पादक तरुण शेतकऱ्यांनी येथील पुणे नाशिक महामार्गालगत ७६ गुंठे जमीन खरेदी केली आहे. या जागेत शीतगृह व पॅक हाऊस प्रकल्प उभारण्यात येणार आहे.

Narayangao News
Mumbai: राज्‍यभरात लवकरच दोन हजार ग्रंथालये; शिक्षण मंत्री दीपक केसरकर

या प्रकल्पाचे भूमिपूजन आमदार अतुल बेनके, कृषी विज्ञान केंद्राचे अध्यक्ष अनिल मेहेर, भाजप नेत्या आशा बुचके,तहसीलदार रवींद्र सबनीस,महाराष्ट्र राज्य मॅग्नेट प्रकल्पाचे सचिन खरमाळे, तालुका कृषी अधिकारी निलेश बुधवंत,महाराष्ट्र बँकेचे व्यवस्थापक चंद्रशेखर बांगर यांच्या हस्ते झाले.

यावेळी द्राक्ष उत्पादक प्रकाश पाटे, गुलाबराव नेहरकर, श्रीराम गाढवे,भाजपाचे तालुकाध्यक्ष संतोष खैरे, माऊली खंडागळे,सरपंच योगेश पाटे,जितेंद्र बिडवई,कृषी अधिकारी हरीश माकर,शिवतेज शेतकरी उत्पादक कंपनीचे अध्यक्ष सतीश पाटे,सर्व संचालक उपस्थित होते.

आमदार बेनके म्हणाले या प्रकल्पाकडे जाणाऱ्या रस्त्याच्या दुरुस्तीसाठी निधी उपलब्ध करून दिला जाईल. अनिल मेहर म्हणाले बदलते हवामान, बाजारभावाचा अभाव, वाढलेला भांडवली खर्च यामुळे शेतकरी वर्ग अडचणी सापडलेला आहे.

Narayangao News
The Kashmir Files मधल्या भूमिकेसाठी पुरस्कार स्वीकारताना Chinmay Mandlekar च्या 'त्या' कृतीने सर्वांचं मन जिंकलं

या पार्श्वभूमीवर अनेक अडचणीचा सामना करत द्राक्ष उत्पादक शेतकऱ्यांनी एकत्र येऊन शीतगृह उभारण्याचा घेतला निर्णय पथदर्शी आहे. बुचके म्हणाल्या प्रकल्प उभारण्यासाठी लागणारी आवश्यक ती मदत शेतकऱ्यांना केली जाईल.

यावेळी तहसीलदार सबनीस,गाढवे,खरमाळे यांनी मार्गदर्शन केले. प्रास्ताविक रेश्मा शिंदे यांनी केले. सूत्रसंचालन संचालक जितेंद्र भोर यांनी केले. आभार अध्यक्ष सतीश पाटे यांनी मांनले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.