Narayangaon Crime : बलात्कार करणाऱ्या आरोपीस सात वर्षे सश्रम कारावास व दहा हजार रुपये दंडाची शिक्षा

लग्नाचे अमिष दाखवून मुलीच्या असहाय्यतेचा फायदा घेऊन बलात्कार.
Crime
Crimesakal
Updated on

नारायणगाव - लग्नाचे अमिष दाखवून मुलीच्या असहाय्यतेचा फायदा घेऊन बलात्कार करणाऱ्या आरोपीस राजगुरूनगर येथील जिल्हा व अतिरिक्त सत्र न्यायालयाचे न्यायाधीश ए. एस. सय्यद यांनी सात वर्षे सश्रम कारावास व दहा हजार रुपये दंड अशी शिक्षा ठोठावली आहे.अशी माहिती नारायणगाव पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक महादेव शेलार यांनी दिली.

या प्रकरणी सचिन खंडू पानसरे याला शिक्षा ठोठावली आहे. आरोपीने डिसेंबर 2010 मध्ये ओळखीतील मुलीच्या घरी जाऊन तिच्या असहाय्यतेचा फायदा घेत व लग्नाचे अमिष दाखवून बलात्कार केला होता. याप्रकरणी पीडित मुलीने दिलेल्या फिर्यादीवरून नारायणगाव पोलीस ठाण्यात डिसेंबर 2010 मध्ये सचिन पानसरे याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला होता.

हा खटला न्यायाधीश सय्यद यांच्या पुढे सुरू होता. त्याचा निकाल बुधवारी (ता.13 ) जाहीर करीत आरोपीला त्यांनी शिक्षा ठोठावली. सरकारी पक्षातर्फे सरकारी वकील शुभांगी देशमुख व मिलिंद पांडकर यांनी काम पहिले. त्यांनी सहा साक्षीदार तपासले. या खटल्यात पीडित मुलगी व डॉक्टर यांची साक्ष महत्त्वपूर्ण ठरली.

सरकारी पक्षाचा युक्तीवाद ग्राह्य धरून आरोपी पानसरे याला भादंवि कलम 376 अनव्ये सात वर्षे सश्रम करावास व दहा हजार रुपये दंड, दंड न भरल्यास सहा महिने साधा कारावास अशी शिक्षा सुनावली. न्यायालयीन कामकाजात पैरवी अधिकारी म्हणून बी. पी. भवारी, एस. बी. खरात यांनी काम पाहिले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.