नारायणगाव - नारायणगाव (ता. जुन्नर) ग्रामपंचायतीच्या चुरशीच्या दुरंगी लढतीत श्री मुक्ताई - हनुमान ग्रामविकास या सत्ताधारी पॅनेलच्या लोकनियुक्त सरपंचपदाच्या उमेदवार डॉ. शुभदा वाव्हळ या 7 हजार 449 मते मिळवून मोठया मताधिक्याने विजयी झाल्या. त्यांनी श्री मुक्ताई - हनुमान ग्रामविकास परिवर्तन पॅनलच्या छाया केदारी यांचा 3 हजार 225 मतांनी पराभव केला.
सदस्यांच्या सतरा जागांपैकी मुक्ताई हनुमान ग्रामविकास पॅनेलचे सोळा उमेदवार विजयी झाले. श्री मुक्ताई -हनुमान ग्रामविकास परिवर्तन पॅनेलचे जुबेर आतार हे एकमेव उमेदवार विजयी झाले.
श्री मुक्ताई - हनुमान ग्रामविकास पॅनलचे प्रमुख,माजी सरपंच योगेश पाटे यांना ग्रामपंचायत सत्ता सलग दुसऱ्यांदा ताब्यात ठेवण्यात यश मिळाले.
ग्रामपंचायत निवडणुकीसाठी माजी सरपंच योगेश पाटे, भाजपचे तालुका अध्यक्ष संतोष खैरे, माजी उपसरपंच संतोष वाजगे, सुरज वाजगे यांच्या नेतृत्वाखाली श्री मुक्ताई- हनुमान ग्रामविकास पॅनल तर राष्ट्रवादी काँग्रेसचे सुजित खैरे, युवा नेते अमित बेनके, माजी जिल्हा परिषद सदस्य राजश्री बोरकर, एकनाथ शेटे, अशोक पाटे, रमेश मेहत्रे यांच्या नेतृत्वाखाली श्री मुक्ताई हनुमान ग्रामविकास परिवर्तन पॅनेल तयार करण्यात आला होता.
रविवारी झालेल्या मतदानात १६ हजार ५८९ पैकी ११ हजार ८१० मतदारांनी (७०.०५ टक्के) मतदानाचा हक्क बजावला. जुन्नर येथील कोंडाजी बाबा डेरे आश्रमात आज सकाळी दहा वाजता मतमोजणी सुरू झाली साडेअकरा वाजता वाजता तहसीलदार रवींद्र सबनीस यांनी निकाल जाहीर केला.
पॅनेल निहाय विजयी सदस्य पदाचे उमेदवार (कंसात मिळालेली मते) : श्री मुक्ताई - हनुमान ग्रामविकास पॅनेल -
प्रभाग क्र. १ : सविता पाटे (688), आरिफ आतार (1033),
प्रभाग क्र. २ : संतोष दांगट ( 854), भावना बेल्हेकर ( 974), ज्योती कुतळ (913).
प्रभाग क्र. ३ : भागेश्वर डेरे (1492), अश्विनी गभाले (1534),
प्रभाग क्र. ४ : योगेश पाटे (1141), छाया बिरमल (1090), सुचिता क्षीरसागर (1042).
प्रभाग क्र. ५ : हेमंत कोल्हे (1181), सुप्रिया अडसरे (1253), शारदा बाळसराफ (1106)
प्रभाग क्र. ६ : प्रिया खैरे (1606), गणेश पाटे (1809), जालिंदर खेरे (1460)
श्री मुक्ताबाई हनुमान ग्रामविकास परिवर्तन पॅनल -
प्रभाग क्र. १ : जुबेर आतार(926)
सहा विद्यमान सदस्यांना पुन्हा संधी - श्री मुक्ताई - हनुमान ग्रामविकास पॅनेलचे माजी सरपंच योगेश पाटे, उपसरपंच अरिफ आतार, गणेश पाटे, संतोष दांगट, अश्विनी गभाले हे सहा विद्यमान सदस्य पुन्हा निवडून आले. माजी सरपंच पाटे हे सलग चौथ्यांदा, अरिफ आतार, संतोष दांगट, गणेश पाटे हे सलग तिसऱ्यांदा विजयी झाले. विजयी उमेदवारांचा सत्कार माजी जिल्हा परिषद परिषद सदस्य आशा बुचके यांच्या हस्ते करण्यात आला.
लोकनियुक्त सरपंच डॉ.शुभदा वाव्हळ - नारायणगाव ग्रामपंचायतची स्थापना 1922 साली झाली. स्थापनेपासून मागील 100 वर्षात प्रथमच पेशाने डॉक्टर असलेल्या महिलेला सरपंच पदाची संधी मिळाली आहे. या माध्यमातून जनतेच्या आरोग्याची काळजी घेण्यासाठी उपाययोजना केल्या जातील.
संतोष खैरे, योगेश पाटे (प्रमुख : श्री मुक्ताई - हनुमान ग्रामविकास पॅनल) - मतदारांनी विकासाला महत्त्व देऊन ग्रामपंचायतिची सत्ता सलग दुसऱ्यांदा आमच्या ताब्यात दिली आहे. आरोप करणाऱ्यांना जनतेने चोख उत्तर दिले आहे. दिलेली आश्वासने पूर्ण करणार. नारायणगावात विकासाची बुलेट ट्रेन आणणार.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.