Onion Issue : आमदार बेनके यांनी वाणिज्य मंत्री गोयल यांची घेतली भेट; कांदा समस्येबाबत निवेदन

जुन्नरचे आमदार अतुल बेनके यांनी आज दिल्ली येथे जाऊन वाणिज्य मंत्री पियुष गोयल यांची भेट घेतली.
piyush goyal and atul benke
piyush goyal and atul benkesakal
Updated on

नारायणगाव - जुन्नरचे आमदार अतुल बेनके यांनी आज दिल्ली येथे जाऊन वाणिज्य मंत्री पियुष गोयल यांची भेट घेतली. केंद्र शासनाने कांदा निर्यातीवर चाळीस टक्के शुल्क आकारण्याचा घेतलेल्या निर्णयाबाबत यावेळी त्यांनी नाराजी व्यक्त केली.

यावेळी कांदा उत्पादकांच्या अडचणी, उत्पादन खर्च, आवश्यक बाजारभाव, कांदा साठवणूकित होणारे नुकसान याबाबतचे निवेदन आमदार बेनके यांनी या वेळी वाणिज्य मंत्री गोयल यांना दिले.

याबाबत आमदार बेनके म्हणाले, केंद्र शासनाने कांदा निर्यातीवर चाळीस टक्के शुल्क आकारण्याचा निर्णय घेतल्याने कांद्याच्या बाजारभावात मोठी घट झाली आहे. चाळीमध्ये कांदा साठवणुकीत खराब झाल्यामुळे शेतकऱ्यांचे सुमारे चाळीस टक्के नुकसान झाले आहे.

कांदा उत्पादनासाठी प्रति किलो पंधरा रुपये खर्च येतो. वाढलेला भांडवली खर्च विचारात घेता कांद्याला किमान प्रति किलोग्रॅम चाळीस रुपये भाव मिळणे आवश्यक आहे. ज्यावेळेस कांदा मातीमोल भावाने विकण्याची वेळ येते. त्यावेळी केंद्रशासन कांदा उत्पादकांच्या प्रश्नाकडे लक्ष देत नाही.

मात्र भाव वाढल्यानंतर निर्यात बंदी करणे, निर्यात शुल्क आकारणे आदी उपाययोजना करते. याचा फटका शेतकऱ्यांना बसतो. कांद्याचे भाव प्रति किलो 25 ते तीस रुपयापर्यंत वाढ झाली होती. मात्र केंद्र शासनाने लगेच निर्यातीवर शुल्क आकारण्याचा निर्णय घेतला. यामुळे कांद्याच्या बाजारभावात मोठी घसरण झाली.

घेतलेला हा निर्णय रद्द करावा. याबाबतच्या निवेदनाचा मेल माझ्या कार्यालयातून वाणिज्य मंत्री पियुष गोयल यांना पाठवला होता. या निवेदनाची दखल घेऊन त्यांनी मला आज सकाळी दहा वाजता भेटीसाठी निमंत्रित केले होते. त्यामुळे आज पहाटेच मी दिल्लीला रवाना झालो.

दरम्यान, आज सकाळी आळेफाटा येथे खासदार डॉ. अमोल कोल्हे यांच्या नेतृत्वाखाली कांदा उत्पादक शेतकऱ्यांचे आंदोलन झाले. या आंदोलनाला माझ्या वतीने तालुका राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष पांडुरंग पवार व इतर पदाधिकारी उपस्थित होते. आज सकाळी मुख्यमंत्री पियुष गोयल यांची भेट घेऊन कांदा उत्पादकांच्या समस्या बाबत चर्चा केली व निवेदन दिले.

कांदा उत्पादक व ग्राहक या दोघांचाही विचार करून केंद्र सरकारने नाफेड मार्फत 2 हजार 410 प्रतिक्विंटल या दराने दोन लाख मेट्रिक टन कांदा खरेदी करण्याचा निर्णय घेतला असल्याची व शेतकऱ्यांनी मागणी केल्यास जास्तीचा कांदा खरेदी करणार असल्याची माहिती यावेळी वाणिज्य मंत्री गोयल यांनी दिली.

प्रति किलो 24 रुपये 10 पैसे या भावाने शेतकऱ्या जवळ शिल्लक असलेला सर्वच कांदा नाफेडणे खरेदी करावा. खरेदी केलेल्या कांद्याचे तत्पर पैसे शेतकऱ्यांना देण्यात यावे. अशी मागणी यावेळी आमदार बेनके यांनी केली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.