Chhagan Bhujbal : विधानसभा निवडणूक येवला येथून लढवणार; माझा पुतण्या मला थांब म्हणाल्यास मी जरूर थांबेल

माझी चूक झाली, माझा अंदाज चुकला, मला माफ करा असे विधान पवार साहेब यांनी येवला येथील सभेत केले असले तरी. आगामी विधानसभा निवडणूक मी येवला येथून लढवणार आहे.
Sharad Pawar And Chhagan Bhujbal
Sharad Pawar And Chhagan Bhujbalsakal
Updated on

नारायणगाव - माझी चूक झाली, माझा अंदाज चुकला, मला माफ करा असे विधान पवार साहेब यांनी येवला येथील सभेत केले असले तरी. आगामी विधानसभा निवडणूक मी येवला येथून लढवणार आहे. मात्र माझे वय झाले असल्याने माझा पुतण्या मला थांब म्हणाल्यास मी जरूर थांबेल. अशी उपरोधिक टीका नाव न घेता राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्यावर कॅबिनेट मंत्री छगन भुजबळ यांनी पत्रकार परिषदेत केली.

कॅबिनेट मंत्री भुजबळ यांनी आज नारायणगाव येथे माजी आमदार वल्लभ बेनके यांची भेट घेऊन त्यांच्या प्रकृतीची चौकशी केली. त्यानंतर आमदार अतुल बेनके यांच्याशी बंद खोलीत चर्चा केली. त्यानंतर झालेल्या पत्रकार परिषदेत छगन भुजबळ यांनी पत्रकारांशी संवाद साधला. यावेळी आमदार अतुल बेनके,कृषी विज्ञान केंद्राचे अध्यक्ष अनिल मेहेर, युवा नेते अमित बेनके, डीडी डोके आदि उपस्थित होते.

या भेटी बाबत भुजबळ म्हणाले माजी आमदार वल्लभ बेनके माझे जुने सहकारी मित्र असून माझे त्यांच्याशी प्रेमाचे संबंध आहेत. त्यांना भेटायला व त्यांच्या प्रकृतीची चौकशी करण्यासाठी आलो होतो. सध्याच्या राजकीय परिस्थितीमध्ये आमदार अतुल बेनके यांनी तटस्थ राहण्याची व आगामी निवडणूक न लढवण्याचा निर्णय घेतला आहे. असा प्रश्न पत्रकारांनी विचारला असता याबाबत भुजबळ म्हणाले, आमच्या सर्वांच्या मनात पवार साहेब यांच्या बद्दल प्रेम आहे.

यामुळे नेते व कार्यकर्ते द्विधा मनस्थितीत आहेत. हीच स्थिती आमदार बेनके यांची आहे.या मुळे सर्वांना बरोबर घेऊन, विचारात घेऊन निर्णय घ्यावा लागतो. आमदार बेनके अनुभवी असून आमदार रोहित पवार वयाने लहान नाहीत. विकासाच्या दृष्टीने काय निर्णय घ्यायचा हे त्यांना चांगले कळत आहे. जे लोक गेले त्याची कारणे काय आहेत. त्याचा उलगडा मुंबई येथे झालेल्या सभेमध्ये आम्ही केला आहे.

उपमुख्यमंत्री अजित पवार, विश्वासू सहकारी दिलीप वळसे पाटील, हसन मुश्रीफ हे का सोडून गेले. गोंदिया पासून कोल्हापूर पर्यंत तर पुणे पासून लातूर पर्यंतचे 40 ते 50 आमदार, खासदार सोडून का गेले. हा विचार सुद्धा करणे आवश्यक आहे. तालुक्याच्या विकास कामाच्या दृष्टीने अतुल बेनके योग्य निर्णय घेतील. असा माझा विश्वास आहे.

खासदार डॉ. अमोल कोल्हे यांच्या भूमिकेविषयी बोलताना भुजबळ म्हणाले, शपथविधीच्या दिवशी खासदार डॉ. कोल्हे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या बंगल्यावर दिवसभर थांबून होते. शपथविधी घेताना सुद्धा ते पहिल्या ओळीत बसले होते. ते समजदार आहेत. त्यांना राजकारण चांगले कळते.

येवला येथे झालेल्या सभेत राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी तुम्हाला उद्देशून माझी चूक झाली, मला माफ करा,माझा अंदाज चुकला अशी भावनिक साद मतदारांना घातली होती. याबाबत बोलताना भुजबळ म्हणाले जुन्नर विधानसभा मतदारसंघ सुरक्षित असल्याने सन 2004 ची निवडणूक मी जुन्नर मधून लढवावी. असा आग्रह पवार साहेब यांनी धरला होता.

मात्र येवला व लासलगाव मतदार संघाच्या कार्यकर्त्यांनी येवला मधून निवडणूक लढवण्याची आग्रह धरला होता. येवला मतदार संघ विकासाच्या दृष्टीने मागासलेला असल्याने मी जुन्नर ऐवजी येवला मतदारसंघातून निवडणूक लढवण्याचा निर्णय घेतला आणि मागील चार-पाच निवडणुकीत लाखाच्या फरकाने निवडून येत आहे. या भागाचा मी विकास केल्यामुळे लोक मला म्हणतात साहेब तुम्ही अशा चुका वारंवार करा.

म्हणजे आमच्या भागाचा विकास होईल. माझे सुद्धा वय झाले आहे अशी टीका होत असली तरी येवला मतदार संघातून मी आगामी निवडणूक लढविणार आहे. मात्र तुम्ही थांबा असा सल्ला मला माझ्या पुतण्याने दिल्यास मी जरूर थांबेल. असा उपरोधिक सल्ला नाव न घेता त्यांनी शरद पवार यांना दिला.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.