Pune News : नऊ वर्षांत मोदींना काँग्रेसचा भ्रष्टाचार का सापडला नाही? काँग्रेस प्रदेश प्रवक्ते गोपाळ तिवारी यांचा सवाल

पंतप्रधान मोदी यांनी काँग्रेसवर केलेल्या कथित भ्रष्टाचाराच्या आरोपांबाबत तिवारी बोलत होते.
Gopal Tiwari
Gopal TiwariSakal
Updated on

पुणे - ‘पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी निराधार आणि तथ्यहीन विधाने करून संविधानिक पदाची प्रतिष्ठा खराब करू नये. गेली नऊ वर्षे सत्तेत असूनही मोदी यांना काँग्रेसचा भ्रष्टाचार का सापडला नाही? तसेच, कोणत्याही भ्रष्टाचारी नेत्यांवर गुन्हा दाखल करून कारवाई का केली नाही’, असा सवाल काँग्रेसचे राज्य प्रवक्ते गोपाळ तिवारी यांनी केला आहे.

पंतप्रधान मोदी यांनी काँग्रेसवर केलेल्या कथित भ्रष्टाचाराच्या आरोपांबाबत तिवारी बोलत होते. ते म्हणाले, ‘विरोधी पक्षातील नेत्यांना ईडी आणि सीबीआयची भीती दाखवली जात आहे. देशासमोर वाढती महागाई, बेरोजगारी, बुडत चाललेली अर्थव्यवस्था, वाढत्या शेतकरी आत्महत्या, कामगारांवरील संकट, राष्ट्रीय बँकातून होणारी लूट असे विविध प्रश्न आहेत.

परंतु याबाबत जनतेची सतत दिशाभूल केली जात आहे. खोटी विधाने करणाऱ्या नेत्यांविरोधात कायदेशीर कारवाई होईल, हे माहीत असल्यानेच निराधार आरोप करण्यात येत आहेत.’ ‘गांधी, नेहरू, पटेल, आझाद, बोस अशा काँग्रेस नेत्यांच्या नेतृत्वामुळेच स्वतंत्र, लोकशाही भारताची स्थापना झाली. त्यामुळेच तुम्ही सत्तेची फळे चाखत आहात. मोदी यांनी या वास्तवतेकडे दुर्लक्ष करू नये,’ असे तिवारी यांनी नमूद केले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.