पुणे - पंतप्रधान नरेंद्र मोदी मंगळवारी (ता. १२) पुणे दौऱ्यावर येत आहेत. त्या अनुषंगाने शहरातील काही रस्त्यांवर वाहतुकीत आवश्यकतेनुसार बदल करण्यात येत आहेत. वाहनचालकांनी नियमांचे पालन करावे, असे आवाहन शहर वाहतूक शाखेचे पोलिस उपायुक्त अमोल झेंडे यांनी केले आहे.