Wagholi Accident : वाघोलीत भरधाव डम्परची विद्यार्थ्यांनी भरलेल्या स्कूलबसला धडक! दुर्घटना थोडक्यात टळली; पाहा व्हिडिओ

Wagholi Accident : वाघोलीत स्कूलबस आणि डम्परचा गंभीर अपघात टळला, बसमध्ये १० ते १५ मुले होती आणि सर्व मुले सुरक्षित आहेत. किरकोळ धक्क्यात बसचा पुढील भाग तुटला, मात्र मोठा अपघात टाळला गेला.
Wagholi School Bus Accident
Wagholi School Bus Accidentsakal
Updated on

वाघोली : डम्परचा गंभीर अपघात होता होता वाचला. किरकोळ अपघातावर निभावले. या बस मध्ये १० ते १५ मुले होती. हा अपघात सी सी टीव्ही कॅमेऱ्यात कैद झाला आहे. ही घटना सकाळी साडे सात वाजण्याच्या सुमारास वाघोली लोहगाव रोड वर ग्रीन रिपब्लिक सोसायटी समोर घडली. सर्व मुले सुरक्षित आहेत. कोणीही जखमी झाले नाही.

मिळालेल्या माहितीनुसार, खराडी येथील कोठारी इंटरनॅशनल स्कूलची बस मुले घेण्यासाठी लोहगाव रोड वरील सोसायटी मध्ये आली होती. मुले घेवून सोसायटी मधून बाहेर पडताना बस अर्ध्या रस्त्यावर आली. लोहगाव कडे भरघाव जाणारा काँक्रिट डंपर बस वर आदळला असता. मात्र डंपर चालकाने रस्त्याच्या खाली डंपर घातला. तरीही बसच्या पुढील भागाला

Wagholi School Bus Accident
Wagholi Accident : वाघोलीत अवजड वाहनाच्या धडकेत दुचाकीवरील महिला ठार; 12 दिवसात अपघातात 7 जणांचा बळी

डम्परची धडक बसली. ही घटना बघणारे धावत बस जवळ गेले. मात्र मुले सुरक्षित असल्याचे त्यांना दिसले. केवळ बसचां पुढील भाग तुटला. त्यानंतर त्या परिसरातील सोसायटीतील नागरिकांनी १०० नंबर वर कॉल करून घटनेची माहिती पोलिसांना दिली. लोणीकंद वाहतूक विभागाचे सहायक पोलिस निरीक्षक गजानन जाधव यांनी घटना स्थळी भेट देवून सोसायटी धारकांशी संवाद साधला. दैव बलवत्तर म्हणून अपघात झाला नाही.

Wagholi School Bus Accident
Wagholi Accident: नवीन कारचा आनंद काही काळच टिकला! पुण्यात भीषण अपघातात तीन तरुणांचा मृत्यू

किरकोळ धडक झाली. मुले सुरक्षित राहिली. मात्र बस व डंपर चालक या दोन्ही बेजबाबदार चालकावर कारवाई करावी. अशी मागणी नागरिकांनी जाधव यांच्याकडे केली. याबाबत कोठारी इंटरनॅशनला स्कूलला दोन वेळा 9767016996 या क्रमांकावर संपर्क साधला असता संबंधित व्यक्ती तुमच्याशी संपर्क साधतील असे सांगण्यात आले. मात्र त्या व्यक्तीने संपर्क साधला नाही.

डम्परच्या वेगाला वेसण घाला

किरकोळ अपघातावर निभावले.मुले सुरक्षित राहिले. वाघोली - लोहगाव रोड कमी रुंदीचा आहे. वाहतूक खूप आहे. त्यातच डंपर वेगाने धोकादायक वाहतूक करतात. त्यांना वेसण घालणे गरजेचे असून रस्ताही रूंद होणे गरजेचे आहे -- कैलास बावणे, अध्यक्ष, ग्रीन रिपब्लिक सोसायटी वाघोली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.