तळेगाव ढमढेरे येथील विद्यार्थ्यांनी शोधलेल्या लघुग्रहाची प्रोव्हिजनल यादीत नोंद

नवीन शोधलेल्या लघुग्रहाला २०२२ बी.व्ही.३९ असे नाव देण्यात आले आहे.
Asteroid Discovery
Asteroid Discovery sakal
Updated on

तळेगाव ढमढेरे : आंतरराष्ट्रीय अवकाश संशोधन संस्था ‘नासा’ ने सुरु केलेल्या आंतरराष्ट्रीय लघुग्रह शोध मोहिमेअंतर्गत तळेगाव ढमढेरे (ता. शिरूर) येथील कुमार जयसिंगराव ढमढेरे जिल्हा परिषद शाळा क्रमांक १ मधील विद्यार्थांनी ग्लोबल मिशन ॲस्ट्रोनॉमी अँड रिसर्च सेंटरच्या विशाल कुंभारे यांच्या मार्गदर्शखाली नवीन शोधलेल्या लघुग्रहाची प्रोव्हिजनल यादीत निवड झाली आहे. या नवीन शोधलेल्या लघुग्रहाला २०२२ बी.व्ही.३९ असे नाव देण्यात आले आहे. “लघुग्रह शोध मोहीम २८ जानेवारी ते २२ फेब्रुवारी २०२२ या कालावधीत राबविली होती. त्यासाठी लागणारी निरीक्षणे अमेरिकेच्या हवाई बेटावरील पॅन स्टार्स टेलिस्कोप मधून घेतली होती. या मोहिमेत मार्गदर्शक विशाल कुंभारे यांच्यासोबत कुमार जयसिंगराव ढमढेरे जिल्हा परिषद शाळा क्रमांक १ मधील ओम ढमढेरे, सुरज जवळे, सोहम पंडित, निरंजन केदारी, चैतन्य गोरे, तन्मय ढवळे या विद्यार्थी निरीक्षकांचा सहभाग आहे.”

विद्यार्थ्यांकडून विज्ञान प्रकल्प करून त्यांच्या संशोधन वृत्तीला चालना देण्यासाठी शिक्षिका माधुरी शेजवळ यांनी विशेष प्रयत्न केले आहेत. या उपक्रमाला मुख्याध्यापक जयवंत भुजबळ व शाळा व्यवस्थापन समितीने प्रोत्साहन दिले आहे."नासा ने सुरु केलेल्या लघुग्रह शोध मोहिमेत मंगळ व गुरु या ग्रहांमध्ये असलेल्या लघुग्रहांच्या पट्यातील लघुग्रह शोधण्याचे विशेष कार्य होते".ग्लोबल मिशन ॲस्ट्रोनॉमी अँड रिसर्च सेंटरच्या टीमने केलेल्या निरीक्षणातील एका लघुग्रहाची प्रोव्हिजनल यादीत निवड झाली असल्याचे माधुरी शेजवळ यांनी सांगितले. या टप्यानंतर लघुग्रहाचे व त्याच्या हालचालीचे निरीक्षण करून त्याची सत्यता पडताळून त्याचे नामकरण केले जाणार आहे. या प्रक्रियेसाठी साधारण ५ ते ७ वर्षाचा कालावधी लागतो.

"मंगळ व गुरु ग्रहांमधील लघुग्रहांच्या पट्यातील लघुग्रह हे सूर्याभोवती परिभ्रमण करत असतात, प्रत्येक लघुग्रहाची परीभ्रमनाची वेळ व गती सारखी नसते, त्यामुळे ते एकमेकांवरती आदळून त्यांचा मार्ग बदलू शकतात. असे लघुग्रह पृथ्वीच्या दिशेने येण्याची व पृथ्वीवरती आदळण्याची शक्यता असते. म्हणून लघुग्रहांचे सतत निरीक्षण करणे व त्यांचा अभ्यास करणे गरजेचे आहे. तसेच लघुग्रहांच्या अभ्यासातून ग्रहांची व सूर्यमालेची निर्मिती कशी झाली? पृथ्वीवरील जीवसृष्टीच्या निर्मितीमध्ये त्यांचे काय योगदान आहे का? अशा रहस्यांचा उलगडा लघुग्रहांच्या निरीक्षण व संशोधनातून करता येतो असे विशाल कुंभारे यांनी सांगितले."लघुग्रह शोध मोहीम शालेय विद्यार्थ्यांमध्ये राबवून त्यांच्यातील अवकाश संशोधनवृत्तीला चालना देण्याचा प्रयत्न ग्लोबल मिशन ॲस्ट्रोनॉमी अँड रिसर्च सेंटर करत असल्याचे श्री कुंभारे यांनी सांगितले.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()