पुणे - राष्ट्रीय ग्राहक आयोगात दाखल झालेल्या पुणे जिल्ह्यातील तक्रारींचे निवारण आयोगाच्या खंडपीठाद्वारे पुण्यात करण्यात येणार आहे. त्यासाठी तब्बल दहा वर्षांनी खंडपीठ पुण्यात येणार आहे.
आझम कॅम्पसमधील न्यू लॉ ऍकॅडमीच्या तिसऱ्या मजल्यावर 11 ते 15 मार्च दरम्यान कामकाज चालणार आहे, अशी माहिती कंझ्युमर ऍडव्होकेट्स असोसिएशनचे (सीएए) उपाध्यक्ष ऍड. ज्ञानराज संत यांनी दिली. 1 कोटींपेक्षा जास्त रकमेचा दावा असल्यास, राज्य ग्राहक आयोगाने दिलेल्या निकालाच्या विरुद्ध अपील करायचे असेल किंवा दावा इतरत्र बदली करायचा असेल तर थेट दिल्ली येथील राष्ट्रीय आयोगाकडे दाद मागावी लागते. राष्ट्रीय आयोगात पुण्यातील दाव्यांची संख्या मोठी आहे. त्यामुळे खंडपीठच सुनावणीसाठी पुण्यात येणार आहे. 4 ते 8 मार्च दरम्यान मुंबईत कामकाज चालणार आहे. या पूर्वी डिसेंबर 2008 मध्ये हे खंडपीठाचे कामकाज पुण्यात झाले होते.
आयोगाचे प्रबंधक अजयकुमार यांनी राज्य सरकारला पत्र पाठविले आहे. त्यात खंडपीठाला राज्याच्या अन्न आणि नागरी ग्राहक संरक्षण विभागाने सुविधा पुरविण्याचे आदेश द्यावेत, अशी मागणी केली. वकिलांनी खटले मार्गी लावण्यासाठी प्रयत्न करावेत. त्यामुळे दावे निकाली निघण्याचे प्रमाण वाढेल, असेही ऍड. संत यांनी सांगितले.
पुण्यातील नागरिकांना दावे दाखल करता येतील. तसेच दाव्याची पहिली सुनावणी पुण्यातच होईल. मात्र, कागदपत्रांमध्ये त्रुटी नकोत. चांगला प्रतिसाद मिळाल्यास वर्षातून एकदा 15 दिवसांसाठी खंडपीठ पुण्यात चालविण्यात यावे, अशी मागणी सरकार आणि आयोगाकडे करता येईल.
ऍड. ज्ञानराज संत, उपाध्यक्ष, सीएए
देशभरातील ग्राहकदाव्यांची स्थिती
आयोग एकूण दाखल दावे निकाली दावे प्रलंबित दावे
राष्ट्रीय आयोग 1,24,418 1,05,070 19,348
राज्य आयोग 8, 12, 044 6,96,466 1,15,578
जिल्हा मंच 39,49,415 36,45,351 3,03,464
एकूण 48, 85, 877 44,47, 487 4,38, 390
सकाळ'ला सोशल मीडियावर लाईक करा :
'सकाळ' फेसबुक : @SakalNews
'सकाळ' ट्विटर : @eSakalUpdate
इन्स्टाग्राम : @esakalphoto
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.