National Technology Day : तंत्रज्ञानातील प्रतिभावंतांची संख्या १२० टक्क्यांनी वाढणार

नॅशनल सायन्स, टेक्नॉलॉजी ॲन्ड इनोव्हेशन पॉलीसी २०२२ मुळे देशाची विज्ञान आणि तंत्रज्ञानाचे धोरण निश्चिती झाले
national technology day 75 thousand jobs history theme and relevance
national technology day 75 thousand jobs history theme and relevanceSakal
Updated on

पुणे : जगातील जवळपास ११ टक्के संगणक तंत्रज्ञ हे भारतीय असून, इंटरनेट आणि सॉफ्टवेअर अभियंत्यांच्या बाबतीत तर आपण जगात तीसऱ्या क्रमांकावर आहे. सध्या भारतीय ब्लॉकचेन तंत्रउद्योगांमध्ये ७५ हजार नोकऱ्या आहेत.

विशेष म्हणजे पुढील दोन वर्षांत या प्रतिभावंतांची सख्या १२० टक्क्यांनी वाढेल, असा अंदाज इंडिया ब्रॅंड इक्विटी फाउंडेशनने व्यक्त केला आहे. राष्ट्रीय तंत्रज्ञान दिनानिमित्त देशातील विज्ञान आणि तंत्रज्ञानाचा घेतलेला आढावा...

वैश्विक नवोन्मेष निर्देशांकात २०२१ मध्ये ५० व्या क्रमांकावर असलेला भारताने २०२२ मध्ये ४० व्या क्रमांकावर झेप घेतली आहे. वेगाने वाढणाऱ्या माहिती तंत्रज्ञान क्षेत्रातील उद्योगांनी २०२२-२३ या आर्थिक वर्षात तब्बल दोन लाखांहून अधिक नव्या नोकऱ्यांची संधी निर्माण केल्या आहेत. नॅशनल सायन्स, टेक्नॉलॉजी ॲन्ड इनोव्हेशन पॉलीसी २०२२ मुळे देशाची विज्ञान आणि तंत्रज्ञानाचे धोरण निश्चिती झाले आहे.

ज्याद्वारे २०३० पर्यंत महिलांचा सहभाग वाढविला जाणार आहे. कृत्रिम बुद्धमित्ता आणि इंटरनेटचा वाढता वापर पाहता शैक्षणिक संस्थांनी आपले अभ्यासक्रमही या पूरक केले असून, देशातील या क्षेत्रातील बाजारपेठ निश्चितच वाढत राहणार आहे.

भारताची शक्ती स्थळे...

१) देशात इंटरनेट आणि सॉफ्टवेअरवर आधारीत ४५० सक्रीय स्टार्टअप्स

२) इंटरनेट आधारीत उद्योगांत मागील आर्थिक वर्षात एप्रिल २०२२ पर्यंत १.३ अब्ज डॉलरची गुंतवणूक

३) मागील दहा वर्षांत विज्ञान आणि तंत्रज्ञान विभागाची गुंतवणूक दहा पटीने वाढली.

४) सन २०१४-१५ मध्ये २,९०० कोटींवरून २०२२-२३ मध्ये ६००२ कोटींवर पोचली आहे.

५) इंटरडीसीप्लिनरी सायबर सिक्युरीटी हब अंतर्गत पुढील पाच वर्षात १५ टेक्नॉलॉजी इनोव्हेशन हब आणि सहा ॲप्लिकेशन इनोव्हेशन हब उभारण्यात येणा

स्तंभालेख वापरावा..

संशोधन आणि विकासातील गुंतवणूक (अब्ज डॉलर)

देश ः वर्ष २०१९-२० ः वर्ष २०२१-२२

चीन ः ५७४.१ ः ६२१.५१

अमेरिका ः ५८०.१८ ः ५९८.७४

जपान ः १८१.१० ः १८२.३६

भारत ः ८५.९२ ः ९३.४८

(स्रोत ः पीआयबी)

एआयची बाजारपेठ ७.८ अब्ज डॉलर

कृत्रिम बुद्धिमत्ता (एआय) प्रणालींचे उद्दिष्टे मानवी तर्कशास्त्र आणि तर्काच्या सारख्याच प्रकारे जटिल समस्यांना सामोरे जाणे आहे. एआयची बाजारपेठ २०२५ पर्यंत ७.८ अब्ज डॉलर पर्यंत पोहोचण्याची अपेक्षा आहे. स्टेट ऑफ द एज्युकेशन रिपोर्ट २०२२ नुसार, एआय २०.२ चक्रवाढ वार्षिक वाढ दर (सीएजीआर) या पटीने वाढेल. सध्या भारतासह जगभरातील बहुतेक देश एआयच्या दृष्टीकोणातून शैक्षणिक बदल आणि मुलभूत संशोधन करत आहे. सप्टेंबर २०२२ पर्यंत एआय स्टार्टअप्समध्ये सन २००० च्या तुलनेत १४ पटींनी वाढ झाली आहे.

एआयची जागतिक बाजारपेठ

- वर्ष २०२१ ः ५९.६७ अब्ज डॉलर

- अपेक्षीत चक्रवाढ वाढ (सीएजीआर) ः ३९.४ टक्के

- वर्ष २०२८ ः ४२२.३७ अब्ज डॉलर

अखिल भारतीय तंत्रशिक्षण परिषद (एआयसीटीई) म्हणून आम्ही सेमिकंडक्टर आणि ॲडव्हान्स कम्युनिकेशन टेक्नॉलॉजीच्या अभ्यासक्रमांना मान्यता देत आहे. त्याचबरोबर कृत्रिम बुद्धिमत्ता, मशिन लर्निंग आणि ब्लॉक चेन संदर्भात मनुष्यबळ विकास ही देशाची गरज असू, त्यासाठीही सर्वसमावेशक धोरण आम्ही निश्चित केले आहे.

- डॉ. अभय जेरे, उपाध्यक्ष,अखिल भारतीय तंत्रशिक्षण परिषद

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.