कोरोनामुळे राष्ट्रीय मतदार दिन यंदा ऑनलाइन

पुणे शहर व जिल्ह्यात सध्या कोरोनाचा संसर्ग वाढत असल्याने यंदाचा राष्ट्रीय मतदार दिन हा ऑनलाइन पद्धतीने साजरा करण्याचा निर्णय जिल्हा निवडणूक विभागाने घेतला आहे.
National Voter day
National Voter daySakal
Updated on

पुणे : पुणे शहर व जिल्ह्यात सध्या कोरोनाचा संसर्ग वाढत असल्याने यंदाचा राष्ट्रीय मतदार दिन हा ऑनलाइन पद्धतीने साजरा करण्याचा निर्णय जिल्हा निवडणूक विभागाने घेतला आहे. येत्या २५ जानेवारी रोजी १२ वा राष्ट्रीय मतदार दिन असल्याचे पुणे जिल्ह्याच्या उप जिल्हा निवडणूक अधिकारी मृणालिनी सावंत यांनी शुक्रवारी (ता.२१) सांगितले.

केंद्रीय निवडणूक आयोगाने यंदाच्या राष्ट्रीय मतदार दिनासाठी ‘सर्वसमावेशक, सुलभ आणि सहभागपूर्ण निवडणूका’ (Making Elections Inculsive, Accessible and Participative) ही संकल्पना निश्चित केली आहे. ही संकल्पना संपूर्ण राज्यात आणि पुणे जिल्ह्यात मतदारांमध्ये रुजविण्याचा प्रयत्न या मतदार दिनाच्या माध्यमातून केला जाणार आहे.

National Voter day
वसंतोत्सव : बहारदार व्हायोलिन-सारंगीच्या जुगलबंदीने रंगला दुसरा दिवस

या संकल्पनेनुसार जिल्ह्यातील दिव्यांग, महिला, ज्येष्ठ नागरिक आणि समाजाच्या उपेक्षित घटकांतील व्यक्तींना विचारात घेऊन मतदार जागृती उपक्रम राबविण्यात येणार असल्याचेही सांवत यांनी स्पष्ट केले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.