Alandi News : देशी गोवंश बचाव जन आंदोलन उषोषण मागे...; आमदार महेश लांडगे यांची शिष्टाई..

मंत्रीमंडळात चर्चा करुन विषय मार्गी लावण्याचे आंदोलनकर्त्यांना उपमुख्यमंत्री फडणवीसांचे आश्वासन..
Milind Ekbotde and Mla mahesh landge
Milind Ekbotde and Mla mahesh landgesakal
Updated on

आळंदी - अखिल भारतीय कृषी गोसेवा संघ पश्चिम महाराष्ट्र अध्यक्ष मिलिंद एकबोटे आणि सहकार्‍यांचे गेली तीन दिवस सुरु असलेले आळंदीतील देशी गोवंश बचाव जन आंदोलन भोसरी विधानसभा आमदार महेश लांडगे यांच्या शिष्टाईने आज मागे घेण्यात आले. यावेळी आमदार लांडगे यांनी उपोषणकर्ते एकबोटे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे मोबाईलवरून बोलणे करुन दिले.

उपोषणमधील विषय मंत्रिमंडळ बैठकीत घेऊन तत्काळ मार्गी लावण्याचे आश्वासन उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आंदोलनकर्त्यांना दिले. आणि उपोषणकर्ते एकबोटे यांचे समाधान झाल्याने आज दुपारी आमदार महेश लांडगे यांचे हस्ते लिंबू सरबत घेऊन उपोषण मागे घेतले आहे.

देशी गोवंशासाठी प्रतिदिन, प्रति गोवंश शंभर रुपयाचे अनुदान मिळावे. राज्यातील गायरानाची जमिन गोपालन, चारा लागवडसाठी उपलब्ध करून द्यावी. रस्त्यावरील मोकाट फिरणाऱ्या गोवंशाच्या संरक्षणासाठी ठोस उपाययोजना करण्यात यावी.

आणि आळंदीसारखी तिर्थक्षेत्र अवैध धंदेमुक्त असावीत अशा चार मागण्यांसाठी मिलिंद एकबोटे आणि त्यांचे सहकारी आळंदीत बेमुदत उपोषणास गुरुवार (ता. १९) पासून आळंदी इंद्रायणी काठी बसले आहेत.

उपोषणाचा आजचा तीसरा दिवस होता. यावेळी आमदार महेश लांडगे आज दुपारी इंद्रायणीकाठी येवून एकबोटे आणि सहकार्‍यांशी चर्चा केली. यावेळी आळंदी पोलिस ठाण्यातील वरिष्ठ पोलिस निरिक्षक भीमा नरके यांची उपस्थीती होती.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.