खडकवासला - राष्ट्रीय महामार्गावरील पश्चिम बाह्यवळणावर मुठा नदीच्या पुलापासून ते नवीन बोगद्यापर्यंत मागील दोन दिवस वाहतूक कोंडी होत आहे. सोमवारी वाहनांच्या रांगा लागल्या होत्या. सुमारे आठ किलोमीटरच्या प्रवासासाठी चार तास लागले.
या घटनेचे पडसाद आज मंगळवारी विधानसभेत दिसून आले. खडकवासल्याचे आमदार भीमराव तापकीर यांनी या वाहतूक कोंडीची औचित्याचा मुद्दा उपस्थित करून सभागृहाचे लक्ष वेधले.
तापकीर म्हणाले मुंबई- बंगळूर राष्ट्रीय महामार्गावर वारजे ते वडगाव बुद्रुक दरम्यान मुठा नदी पूल परिसरात रस्त्यावर पडलेल्या मोठ्या खड्यांमुळे आणि अरुंद रस्त्यामुळे काल सोमवारी वाहतूक पूर्णपणे ठप्प झाली होती.
अवजड वाहनांची मोठी संख्या आणि अरुंद रस्त्यामुळे कोंडीत अडकलेल्या वाहनांच्या रांगा वडगाव पुलापासून नवीन कात्रज बोगद्यापर्यंत लागल्या होत्या.
हे आठ किलोमीटर अंतर पार करण्यासाठी चालकांना चार- चार तासांचा वेळ लागत होता. यावेळी वाहतूक व्यवस्थापन करण्यासाठी वाहतूक पोलिसांची संख्या देखील अपुरी होती.
प्रामुख्याने वडगाव, धायरी, सिंहगड रस्ता, नऱ्हे, आंबेगाव, कात्रज, भारती विद्यापीठ परिसरातील अंतर्गत वाहतुकीवर या कोंडीचा परिणाम झाला. वडगाव पुलावरील खड्डयांमुळे ही परिस्थिती निर्माण झाली आहे.
पुणे, वडगाव बुद्रुक, नऱ्हे, वारजे गावाच्या हद्दीतून जाणारा राष्ट्रीय महामार्गाचा रस्ता जांभूळवाडी (दरीपुल) बोगद्यामार्गे मुंबई - बंगळुरू मार्गात गेल्या काही वर्षात या परिसरात मोठ्या अपघातांचे सत्र सुरू असून ठिकाणी गेल्या आठ वर्षांमध्ये १८८ हुन अधिक अपघात झाले आहेत.
त्यामध्ये अनेक निष्पाप नागरिकांचा बळी गेला असतांना ठोस उपाययोजना करण्याकडे प्रशासनाचे दुर्लक्ष होत असल्यामुळे तात्पुरते उपाय न करता रखडलेले सेवा रस्ते पूर्ण करून कायमस्वरूपी ठोस उपाययोजना म्हणून मुख्य उतार कमी करणे,
स्वामी नारायण मंदिर ते दरीपुल यामधील तीव्र वळण कमी करणे, सर्व्हिस रस्ते सलग तयार करून रुंद करणे, दुरुस्ती करणे, तेथील अतिक्रमणे काढणे, अनधिकृत होर्डिंग काढणे, रिंगरोड तयार करून वाहतूक शहराबाहेरून वळविणे, वारजे ते नवले पूल, नवले पूल ते कात्रज दरम्यान सर्व्हिस रस्ता करणे गरजेचे आहे.
स्वामी नारायण मंदिर ते नवले पुलाच्या दरम्यान वारंवार होणाऱ्या अपघातांमुळे हा मार्ग मृत्यूचा सापळा ठरत असतांना तात्पुरत्या उपाययोजना न करता तीव्र उतार कमी करण्यासाठी स्वामी नारायण मंदिर ते नवले पुलाच्या दरम्यान वाढत्या अपघातांच्या पार्श्वभूमीवर नऱ्हे जंक्शन ते नवले पूल या दरम्यान उड्डाणपुल उभारण्याबाबत राज्य सरकार केंद्र सरकारच्या माध्यमातून पाठपुरावा करणार असल्याचे दि. २७ डिसेंबर, २०२२ रोजी महाराष्ट्र विधानसभेच्या हिवाळी अधिवेशनात माझ्या लक्षवेधीच्या चर्चेदरम्यान प्रभारी सार्वजनिक बांधकाम मंत्री शंभूराजे देसाई सांगितलं होते.
यासोबतच वडगाव उड्डाण पुल (Flyover) व मुठा नदीवरील पूल हा चार पदरी आहे आणि महामार्ग सहा पदरी असलेने या पट्ट्यात वाहतूक कोंडी सततची आहे. याकरिता पुलाच्या दोन्ही बाजूस स्वतंत्र सेवा रस्त्यासाठी महामार्ग प्राधिकरणाला (NHI) ला पुलाचे बांधकाम करण्याचे देखील मी सुचवीत आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.