पुणे - कोरोनाची (Corona) कोणतीच लक्षणे नव्हती, पण दम लागत होता. सातवा महिना सुरू असल्यामुळे कदाचित असे होत असावे हा भ्रम झाला. मात्र, एकाएकी त्रास सुरू झाल्यावर चाचणी (Test) केली आणि अहवाल पॉझिटिव्ह (Positive) आला. पण ऑक्सिजनची पातळी (Oxygen Level) कमी झाल्यामुळे रुग्णालयात (Hospital) दाखल करण्याची वेळ आली. दुर्दैवाने कोणत्याच रुग्णालयात बेड मिळत नव्हते. अखेर पूना हॉस्पिटल आणि रिसर्च सेंटरमध्ये या महिलेला दाखल करण्यात आले. वेळेत उपचार मिळाल्याने आज ३९ वर्षीय नवनीता भट्टाचारजी (Navneeta Bhattacharji) आणि त्यांचे बाळ सुखरूप आहेत. (Navneeta Bhattacharji and her Baby is Safe)
नवनीता या पिंपरी चिंचवड येथे राहतात. ७ एप्रिल रोजी त्यांना पूना हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले होते. त्यांचे फुफ्फुस केवळ २० टक्के क्षमतेने काम करीत होते. त्यामुळे त्यांना व्हेंटिलेटरवर ठेवण्यात आले होते. व्हेंटिलेटरवर ऑक्सिजन देऊन सुद्धा ऑक्सिजन पातळी ही ६४ टक्केच राहत होती. त्यामुळे आई व बाळाचा जीव वाचवण्यासाठी डॉक्टरांनी तिच्यावर सिझेरीन शस्त्रक्रिया करण्याचा निर्णय घेतला. अशा परिस्थितीमध्ये शस्त्रक्रिया करणे हे देखील तितकेच जोखमीचे काम होते. कारण नवनीता यांना ‘कार्डियाक अरेस्ट’ होण्याची शक्यता होती. मात्र, तो धोका पत्करत केलेली शस्त्रक्रिया यशस्वी झाली आणि नवनीताने ९०० ग्रॅमच्या बाळाला जन्म दिला. आईच्या गर्भात कमी ऑक्सिजन मिळाल्यामुळे बाळाला पण व्हेंटिलेटरवर ठेवावे लागले. त्यानंतर तब्बल एक महिने नवनीता या अतिदक्षता विभागात (आयसीयू) तर त्यांच्या बाळाला एनआयसीयूमध्ये ठेवण्यात आले. वेळेत उपचार मिळाल्याने या दोघांचे प्राण वाचविणे शक्य झाले.
नवनीता यांच्या उपचारासाठी रुग्णालयातील स्त्रीरोगतज्ञ डॉ. सुनीता उंबरकर, डॉ. अजित तांबोळकर, डॉ. नितीन अभ्यंकर, डॉ. संजय पुजारी, डॉ. हसमुख गुजर, डॉ. जान्हवी थत्ते आदींनी योगदान दिले.
रोज जिवन मृत्यूशी झुंज देत असताना नवनीता यांना दोन वेळा व्हेंटिलेटरवर ठेवण्यात आले. त्यांना ‘कार्डियोमायोपॅथी’ या आजाराला सामोरे जावे लागले. कार्डियोमायोपॅथी हा हृदयाच्या स्नायूंचा विकार आहे. यामध्ये हृदयाची शरीराला रक्तपुरवठा करण्याची क्षमता कमी होत जाते. नवनीता यांच्या हृदयाची रक्तपुरवठा करण्याची क्षमता ३० टक्के झाली होती. परंतु त्यांचे प्राण वाचविण्यात आम्हाला यश मिळाले. नवनीता आणि बाळाला घरी सोडण्यात आले आहे.
- डॉ. सुनीता उंबरकर
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.