Indian Navy : नौदलातील वरिष्ठ अधिकारी व्हाईस ॲडमिरल गुरचरणसिंग 'NDA'चे नवे कमांडंट

एनडीएचे माजी विद्यार्थी असलेल्या व्हाइस ॲडमिरल गुरचरणसिंग यांना १९९० मध्ये नौदलात (Navy) रूजू झाले.
Navy senior officer Vice Admiral Gurcharan Singh
Navy senior officer Vice Admiral Gurcharan Singhesakal
Updated on
Summary

गुचरणसिंग भारतीय बनावटीच्या तीन युद्धनौकांवर सुरुवातीच्या काळात (कमिशनिंग क्रू) काम करण्याची संधी मिळाली.

पुणे : राष्ट्रीय संरक्षण प्रबोधिनीच्या (NDA) समादेशकपदी (कमांडंट) नौदलातील वरिष्ठ अधिकारी व्हाइस ॲडमिरल गुरचरणसिंग (Vice Admiral Gurcharan Singh) यांची नियुक्ती करण्यात आली आहे. ‘एनडीए’चे मावळते कमांडंट व्हाइस ॲडमिरल अजय कोचर यांच्याकडून त्यांनी शनिवारी कमांडंटपदाची सूत्रे स्वीकारली.

एनडीएचे माजी विद्यार्थी असलेल्या व्हाइस ॲडमिरल गुरचरणसिंग यांना १९९० मध्ये नौदलात (Navy) रूजू झाले. त्यांना तोफा आणि क्षेपणास्त्र विषयातील तज्ज्ञ मानले जाते. नौदलात आयएनएस रणजीत आणि आयएनएस प्रहार या युद्धनौकांवर त्यांनी काम केले आहे.

Navy senior officer Vice Admiral Gurcharan Singh
दारूविक्रीचा परवाना देण्यापूर्वी महापालिकेची NOC घ्या, अन्यथा..; महापालिकेच्या 'या' प्रस्तावाला केराची टोपली

गुचरणसिंग भारतीय बनावटीच्या तीन युद्धनौकांवर सुरुवातीच्या काळात (कमिशनिंग क्रू) काम करण्याची संधी मिळाली. त्यांनी आयएनएस ब्रह्मपुत्रा (INS Brahmaputra) या युद्धनौकेवर गनरी ऑफिसर, आयएनएस शिवालिक या युद्धनौकेवर कार्यकारी अधिकारी आणि आयएनएस कोची, आयएनएस विद्युत, आयएनएस कुकरी या युद्धनौकांवर कमांडिंग ऑफिसर म्हणून काम केले आहे. तर, नौदलाचा प्रशिक्षण तळ (गनरी स्कूल) असलेल्या आयएनएस द्रोणाचार्य येथे प्रशिक्षक व गोव्यातील नेव्हल वॉर कॉलेज येथे उपसमादेशक (डेप्युटी कमांडंट) म्हणूनही काम केले आहे.

Navy senior officer Vice Admiral Gurcharan Singh
'सुरेंद्रकुमार अग्रवाल, विशाल अग्रवाल यांनी धमकावून चालकाचा फोन काढून घेतला'; कल्याणीनगर अपघात प्रकरणात नवा ट्विस्ट!

नौदल मुख्यालयात कार्मिक विभागाचे संचालक, नौदल मुख्यालयातील नौदल गुप्तवार्ता विभागाच्या मनुष्यबळ विभागाचे सहप्रमुख आदी जबाबदाऱ्याही पार पडल्या आहेत. त्यांची २०२२मध्ये पूर्व ताफ्याच्या प्रमुखपदी नियुक्ती झाली होती. २०२४ मध्ये त्यांना व्हाइस ॲडमिरल पदावर बढती मिळाली. त्यांनी कार्मिक विभागाचे नियंत्रक म्हणून महत्त्वाचे काम केले.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.