‘एनसीसी’ विद्यार्थ्यांचे पाऊल पडते पुढे!

विद्यापीठे, तंत्र शिक्षण संस्थांमधील विशेष विषयांमध्ये अभ्यासक्रमाचा समावेश
Army Parade
Army ParadeSakal
Updated on

पुणे : राष्ट्रीय छात्र सेना (एनसीसी) म्हटलं, की डोळ्यांसमोर येते ते युनिफॉर्म घालून शिस्तबद्ध संचलन करणारे एनसीसी कॅडेट्स. केवळ लष्करात जाण्याची संधी म्हणून एनसीसीकडे पाहिले जाते. परंतु संशोधन, शिक्षण संस्था आणि उद्योग क्षेत्रामध्ये ही एनसीसीचा कौशल्य प्राप्त विद्यार्थ्यांची गरज आहे. मात्र याबद्दल ते अनभिज्ञ असल्याचे दिसून येत आहे.

त्यातील सुमारे एक लाख हे राज्यात आहेत. महाराष्ट्रात एकूण सात एनसीसी युनिट असून प्रत्येक युनिटमध्ये १५ ते २० हजार एनसीसी कॅडेस्ट आहेत. यामध्ये पुणे, मुंबई, अमरावती, नागपूर, औरंगाबाद आणि कोल्हापूर या जिल्ह्यांचा समावेश आहे. मुलांना शालेय शिक्षण करताना तसेच पदवी प्रशिक्षणादरम्यान एनसीसीमध्ये भाग घेता येतो. तर या वर्षापासून विद्यापीठे आणि तंत्र शिक्षण संस्थांमध्ये विशेष विषयांमध्ये एनसीसी अभ्यासक्रमाचाही समावेश करण्यात आला आहे. यामुळे संशोधन, उद्योग अशा काही क्षेत्रांमध्ये ही विद्यार्थ्यांना संधी मिळेल, अशी माहिती पुणे एनसीसी ग्रुप कमांडर ब्रिगेडिअर सुनील लिमये यांनी दिली.

Army Parade
गुंड सोन्या धोत्रे अखेर 'स्थानबद्ध'

‘ए’, ‘सी’ सर्टिफिकेट फायदे...

  • लष्कराच्या तिन्ही दलांमध्ये अधिकारी किंवा जवान म्हणून काम करण्याची संधी

  • पॉलिटेक्निक महाविद्यालयात १५ जागा राखीव

  • वैद्यकीय महाविद्यालयात प्रवेश मिळविण्यासाठी अतिरिक्त तीन गुण

  • राष्ट्रीय स्तरावरील स्पर्धांमध्ये राज्याचे प्रतिनिधित्व करणाऱ्या एनसीसी कॅडेट्सला

  • अभियांत्रिकी महाविद्यालयात दहा जागा राखीव

  • आयटीआयच्या प्रवेशासाठी अतिरिक्त चार गुण

  • ‘सी’ सर्टिफिकेट उत्तीर्ण केल्यावर खासगी क्षेत्रात सिक्युरीटी अधिकारी म्हणून संधी

Army Parade
‘तालिबानीस्तान’मुळे ड्राय फ्रूट आयातीला फटका

‘एनसीसी’ची सद्यःस्थिती -

(यामध्ये आर्मी नेव्ही आणि एअरफोर्स विंगचा समावेश)

  • एनसीसीचे देशातील एकूण राज्यनिहाय संचालनालय- १७

  • ग्रुप हेडक्वार्टर (मुख्यालय)- ९८

  • एनसीसी युनिट -८२५

देशातील मार्च २०२१ पर्यंतच्या आकडेवारीनुसार -

एकूण सहभाग झालेले कॅडेट्स - १३,४७,४३६

  • मुले - ८,९३,०७४

  • मुली- ४,५४,३६

Army Parade
परस्पर संमतीने २१ दिवसांत घटस्फोट

एक लाख विद्यार्थ्यांना संधी

देशाच्या किनारपट्टी आणि सीमावर्ती जिल्ह्यांमधील युवकांच्‍या आकांक्षापूर्तीसाठी एनसीसीच्या विस्तारासाठी संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी मंजुरी दिली आहे. यामध्ये एनसीसीच्या कॅडेट्सच्या प्रशिक्षणाकरिता ८३ एनसीसी युनिट्सचे अद्ययावतीकरण केले जाणार आहे. यामुळे एकूण १७३ जिल्ह्यांतील एक हजारहून अधिक शाळा महाविद्यालयांतील जवळपास एक लाख कॅडेट्सला एनसीसीमध्ये सहभाग घेता येईल. राज्यांच्या सहकार्याने हे विस्तार कार्य राबविण्यात येणार आहेत.

Army Parade
व्याजाच्या पैशांची परतफेड करूनही गोळ्या झाडून दिली जीवे मारण्याची धमकी

"खासगी संस्थेत काम करत असताना मला एनसीसी मुख्यालयातील विविध प्रवेशांबाबत समजले, त्यासाठी मी अर्ज भरला. परीक्षा आणि मुलाखती उत्तीर्ण झाल्यावर मला एनसीसी मुख्यालयात सरकारी नोकरी मिळाली. पण ही संपूर्ण प्रक्रिया करत असताना लक्षात आले, की राज्यातील एनसीसीचे कॅडेट्सने या प्रशिक्षणाचा योग्य वापर करायला हवा."

- रिता खंडागळे, गर्ल्स कॅडेट इन्स्ट्रक्टर

"शिस्त आणि वेळेचे काटेकोर नियोजन हा एनसीसीच्या कॅडेट्सचा अंगभूत गुणधर्म आहे. त्यामुळे नोकरी व शैक्षणिक क्षेत्रात ही वेगवेगळ्या संधी उपलब्ध होतात. एनसीसीच्या मुलांसाठी सवलत असलेल्या वेगवेगळ्या शैक्षणिक संस्थेत प्रवेश, प्रवेश परीक्षा आणि नोकरींबाबत वेळोवेळी त्यांना माहिती दिली जाते. एनसीसीचा उद्देश केवळ लष्करासाठी तरुणांना तयार करणे नसून देशाला एक जबाबदार नागरिक पुरविणे हादेखील आहे."

- कर्नल विनायक चव्हाण, कमांडिंग ऑफिसर-२ महाराष्ट्र गर्ल्स बटालियन एनसीसी (पुणे)

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.