पुणे - राज्यात महिन्याच्या सुरुवातीला नवीन सरकार स्थापन झालं. नवीन सरकार स्थापन झाल्यानंतर मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांनी शपथ घेतली. सरकार स्थापन होऊन २५ दिवस झाले असून अद्याप मंत्रीमंडळ विस्तार झाला नाही. त्यामुळे राज्याचा गाडा सध्या फक्त मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे दोघेच हाकत असल्याचं चित्र असून पुण्यात राष्ट्रवादी काँग्रेसकडून नवीन सरकारला डिवचणारं आंदोलन करण्यात आलं असून पुणेकरांना कोणी पालकमंत्री देता अशा घोषणा दिल्या. (NCP agitation for Guardian minister news in Marathi)
पुण्यातील राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या आंदोलनमध्ये शहर अध्यक्ष प्रशांत जगताप, प्रवक्ते प्रदीप देशमुख यांच्यासह कार्यकर्ते उपस्थितीत होते. २३ दिवसांत ८९ शेतकऱ्यांच्या आत्महत्या झाल्या असून ED सरकार तुमचे राजकारण थांबवा असे म्हणत आंदोलनात घोषणाबाजी करण्यात आली.
राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी, पुणे शहराच्या वतीने राज्यातील शिंदे- फडणवीस सरकारच्या गलथान कारभाराविरोधातही घोषणाबाजी करण्यात आले. पुणे जिल्हाधिकारी कार्यालयाबाहेर हे आंदोलन करण्यात आले. यावेळी राष्ट्रवादी काँघ्रेसच्या महिला पदाधिकारी देखील उपस्थित होत्या.
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.