Ajit Pawar News : पुणे लोकसभा पोटनिवडणूक होणारच! अजित पवारांनी स्पष्टच सांगितलं; म्हणाले...

NCP Ajit Pawar
NCP Ajit PawarEsakal
Updated on

भाजपचे दिवंगत नेते गिरीश बापट यांच्या निधनामुळे पुणे लोकसभेची जागा रिक्त झाली आहे. यानंतर राज्याच्या राजकीय वर्तुलात पुणे लोकसभेची पोटनिवडणूक होणार असल्याची जोरदार चर्चा आहे. पुणे निवडणूक विभागाने याबाबत संपूर्ण तयारी केली असून तातडीने निवडणूक जाहीर होण्याची दाट शक्यता वर्तवली जात आहे. यादरम्यान विरोधीपक्ष नेते अजित पवार यांनी मोठा खुलासा केला आहे.

पुण्यातील लोकसभा पोटनिवडणूकीबद्दल बोलताना अजित पवार म्हणाले की, "मला एक बातमी अशी पण कळली की, मला वाटत होतं की लोकसभेच्या निवडणूकीला एकच वर्ष राहीलं आहे. त्यामुळे पोटनिवडणूक लागणार नाही. पण बहुतेक पुण्याची... बापट साहेबांचं दुखःद निधन झाल्यानंतर... ती पण पोटनिवडणूक लागण्याची शक्यता आहे. अशी माझी आतल्या गोटातील माहिती आहे."

NCP Ajit Pawar
PM Modi : नवीन संसदेच्या उद्घाटनावर बहिष्कार टाकणाऱ्यांवर CM शिंदे बरसले; म्हणे, नावडतीचं…

"निवडणूक लागल्यानंतर ज्या मित्रपक्षापैकी ज्यांची ताकद जास्त असेल त्यांना ती जागा मिळावी. आता ताकद जास्त आहे ते कसं मोजायचं? वजन करायचं का? तर नाही. त्यासाठी मागे झालेल्या स्थानिक स्वराज्य संस्थांची माहिती घ्यायची. आमदारकीच्या निवडणूकीत कोणाला किती मतं पडली याची माहिती घेतल्यानंतर अंदाज येतो" असेही अजित पवार म्हणाले आहेत.

पुणे लोकसभेचे खासदार गिरीश बापट यांचे निधन (ता. २९ मार्च २०२३ रोजी) झाले. बापट यांच्या निधनामुळे ही जागा रिक्त आहे. याबाबतची माहिती जिल्हा प्रशासनाकडून केंद्रीय निवडणूक आयोगाकडे पाठविली आहे. पुढील वर्षी म्हणजे एप्रिल २०२४ मध्ये लोकसभेच्या सार्वत्रिक निवडणुका होणार आहे. त्यामुळे अवघ्या काही महिन्यांसाठी पुणे लोकसभेसाठी पोटनिवडणूक होणार की नाही याबाबत चर्चा सुरू आहे.

NCP Ajit Pawar
किती ही मस्ती! आधिकाऱ्याचा फोन पडला बंधाऱ्यात; ३ दिवस ३० एचपी पंपाने नासवलं पाणी

हे उमेदवार चर्चेत -

पुणे लोकसभेची ही जागा काँग्रेसच्या वाट्याला जाणार असल्याचे सांगितले जाते. त्यामुळे कसब्यात जायंट किलर ठरलेले रवींद्र धंगेकरांना या निवडणुकीत उतरवण्याची तयारी काँग्रेसची आहे. तर भाजपकडून स्वरदा बापट, मुरलीधर मोहोळ आणि संजय काकडे यांच्या नावाची चर्चा सुरू आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.