पुणे- पवार-पाटील वाद पुन्हा पेटण्याची शक्यता आहे. हर्षवर्धन पाटील यांच्या कन्या अंकिता पाटील यांनी थेट उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यावर निशाणा साधला आहे.त्यांनी आमची फसवणूक केली, आमच्या पाठीत खंजीर खुपसला, मागच्या तिनही वेळेस त्यांनी शब्द देऊन फिरवला, त्यामुळे यावेळी जो कोणी उमेदवार असेल ते आमचं विधानसभेला काम करणार असतील तर लोकसभेला आम्ही त्यांच काम करू, असं अंकिता पाटील म्हणाल्या आहेत.
सध्या अजित पवार आणि हर्षवर्धन पाटील हे महायुतीमध्ये आहेत. मात्र, पवार-पाटील वाद हा सर्वश्रूत आहे. या दोन घराण्यांमधील वाद हा आत्ताचा नाही तर शरद पवार आणि शंकरराव पाटलांपासूनचा आहे. त्यामुळे या दोन्ही घराण्याचा राजकीय इतिहास नेमका काय? इंदापुरमधला दोन्ही घराण्याचा वाद काय आणि याचा महायुतीवर कसा हे आपण जाणून घेऊया.
पाटील घराणं इंदापुर मधलं मोठं राजकीय घराणं. इंदापुर हा बारामती लोकसभेचा भाग. आणि बारामतीत कोणाचा शिक्का चालतो हे काही नव्यानं सांगायला नको.तर शंकरराव पाटील हे काँग्रेसचे मातब्बर नेते. 1980 मध्ये ते बारामतीचे खासदार म्हणून लोकसभेवर गेले. दरम्यान १९८४ साली शरद पवारांनी शंकरराव पाटलांचा पराभव केला. त्यावेळी समाजवादी काँग्रेस होतं. पण त्यानंतर १९८५ ला शरद पवारांनी लोकसभेचा राजीनामा दिला आणि पोटनिवडणूक लागली . पुन्हा काँग्रेसनं शंकरराव पाटलांनी संधी दिली आणि त्यांच्याविरोधात जनता पक्षाचे संभाजीराव काकडे होते. पण या निवडणूकीत शरद पवारांनी शंकरराव पाटलांऐवजी संभाजीराव काकडेंना पाठिंबा दिला.
त्यानंतर १९८९ साली पक्षानं त्यांना पु्न्हा संधी दिली. हा मतदारसंघ काँग्रेसचा आणि शंकरराव पाटलांचा चांगलाच समर्थक होता. त्यामुळे १९९१ सालच्या लोकसभेवेळीही काँग्रेसमधून शंकरराव पाटलांचे नाव समोर येत होतं. पण यावेळी शरद पवारांनी हस्तक्षेप केला आणि पाटलांच तिकीट कापण्यात आल्याचं बोललं जातं. आणि यावेळी संधी मिळाली ती अजित पवारांना. तिथुनच पवार विरुद्ध पाटील घराण्याचा वाद सुरु झाला.
१९९४ साली हर्षवर्धन पाटलांना पुणे जिल्हा परिषद लढवायची होती. पण यावेळी हस्तक्षेप केला अजित पवारांनी. आणि काँग्रेसनं पाटलांचं तिकीट नाकारलं. पाटलांच्या डोक्यात याचा राग होता. तेव्हा काँग्रेसविरोधात अपक्ष उभं राहून हर्षवर्धन पाटील जिल्हा परिषद निवडणूकीत विजयी झाले.
त्यानंतर हर्षवर्धन पाटील आमदारकीच्या मैदानात उतरले. काँग्रेसकडून त्यांना निवडणूक लढवायची होती. पण काँग्रेसनं तिकीट नाकारलं त्यामुळे पाटलांनी अपक्ष निवडणूक लढवली आणि जिंकूनही आले. त्यानंतर पाटलांनी २ वेळा म्हणजे 1999, २००४. साली अपक्ष म्हणूनच निवडणूक लढवली आणि जिंकलीही. पण या दरम्यान काँग्रेसचा बालेकिल्ला असणारा इंदापुर भाग पक्षापासून दूर जात असल्याचं बघून पक्षानं हर्षवर्धन पाटलांना २००९ साली उमेदवारी दिला आणि पाटील आमदार म्हणून निवडूण आले.
पण यातंच संघर्ष सुरु झाला तो अजित पवार आणि हर्षवर्धन पाटलांचा. २०१४ आणि २०१९ साली अजित पवारांनी हर्षवर्धन पाटलांच्या विऱोधात दत्ता भरणे यांच्या पाठिमागे ताकद लावली आणि हर्षवर्धन पाटील यांचा पराभव केला.
एकप्रकारे अजित पवारांनी इंदापुरच्या जागेवर आपलाच ताबा सांगितला. २०१९ साली अजित पवारांनी इंदापुरात केलेलं भाषण चांगलंच गाजलं होत. ज्यात अजित पवार म्हणाले होते की, वाट्टेल ते झालं तरी इंदापुरची जागा राष्ट्रवादीची सोडली जाणार नाही. भले आघाडी नाही झाली तरी बेहत्तर हा अजित पवारचा शब्द आहे.'
आता पवार- पाटील घराण्यच्या या वादात तिसरी पिढी सुद्धा उतरलीये. ती म्हणजे अंकिता पाटील आणि राजवर्धन पाटील. काही दिवसांपासून अंकिता पाटील या मैदानात सक्रिय झाल्यात. बारामती लोकसभेला त्या मैदानात उतरणार अशी चर्चाही होती. निर्धार... बारामती भाजपमय करण्याचा! ही त्यांची सोशल मिडीया पोस्टही चांगलीच चर्चेत आली होती.
बारामती मतदारसंघात त्या फिरताना आणि लोकांच्या तरुणांच्या गाठीभेटी घेताना त्या पहायला मिळाल्या होत्या. पण या लोकभेवर अजित पवारांनी दावा केलाय. अजित पवारांच्या पत्नी सुनेत्रा पवारांना या ठिकाणी उमेदवारी मिळण्याची शक्यता आहे. त्यामुळे बारामती लोकसभेवर अंकिता पाटलांनी पकड ढिली केली. पण इंदापुरच्या जागेवर अंकिता पाटील ठाम आहेत.
ते आमचं विधानसभेला काम करणार असतील तर लोकसभेला आम्ही त्यांच काम करू असं अंकिता पाटील म्हणाल्यात. तर राजवर्धन पाटील यांनी देखील २०२४ ला विधानसभा निवडणूक आम्ही लढणार असल्याचं जाहीर केलंय. पण अजित पवारांनी याठिकाणी दत्ता भरणेंसाठी आधीच फिल्डींग लावलीये. त्यामुळे जेव्हा अंकिता पाटलांनी अजित पवारांवर हा हल्लाबोल केला तेव्हा अजित पवारांनी त्यावर फार बोलणं टाळलं.
नवीन जनरेशन आहे त्यामुळे यावर आम्ही फडणवीस हर्षवर्धन पाटलांशी बोलू असं अजित पवार म्हणाले. एकप्रकारे इंदापुरचा दावा अजित पवार सोडताना दिसत नाहीयेत. त्यामुळे आगामी काळात काय होतंय. हर्षवर्धन पाटील इंदापुरचा दावा सोडणार का? की कायम ठेवणार? आणि अजित पवार यावर काय मार्ग शोधणार हे पाहणं महत्वाच ठरेल. (Latest Marathi News)
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.