पुणे- राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रमुख आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांची जन सन्मान यात्रा ही राज्यातील विविध जिल्ह्यांमध्ये होत आहे. अजित पवार यात्रेच्या माध्यमातून महिला, कार्यकर्त्यांशी संवाद साधत आहेत. अजित पवार यांनी आंबेगावमधील यात्रेमध्ये बोलताना लोकसभेसारखा दणका विधानसभेला न देण्याची कळकळीची विनंती जनतेला केली आहे.
सर्व योजनेसाठी आम्ही चांगले पैसे देत आहोत. दुसरा कोणीही इतके पैसे देत नाही. माझं काम बोलतं काम. आपलं कामच भारी आहे. फक्त लोकसभेसारखा दणका देऊ नका, बाबा. लई वंगाळ वाटतं. लोकसभेला दणका दिला तर योजना बंद होईल. योजना चालवायची की थांबवायची हे तुमच्या हातात आहे, असं अजित पवार म्हणाले.