पुणे (Pune) : राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांनी आज (गुरुवार) थेट एकेकाळचे जवळचे विश्वासू सहकारी दिलीप वळसे पाटील यांच्या मतदारसंघात जाऊन त्यांचा समाचार घेतला. सत्ता मिळविण्यासाठी ज्याप्रकारे त्यांनी भूमिका घेतली ती चुकीची होती. आंबेगावमधील नेत्याच्या भूमिकाचा सर्वाधिक धक्का तालुक्यातील जनतेला बसला. आता निष्ठा काय असते हे दाखवून देण्याची वेळ आली आहे असे पवार यांनी सांगितले.