राष्ट्रवादीच्या नगरेसवकांमध्ये पुणे महापालिकेच्या प्रभाग रचनेवरून नाराजी

पुणे महापालिकेच्या प्रारूप प्रभाग रचनेचा फटका केवळ भाजपला बसला असे चित्र निर्माण झाले असले तरी राष्ट्रवादीच्या नगरेसवकांमध्येही प्रभाग रचनेवरून नाराजी निर्माण झाली आहे.
NCP
NCPesakal
Updated on
Summary

पुणे महापालिकेच्या प्रारूप प्रभाग रचनेचा फटका केवळ भाजपला बसला असे चित्र निर्माण झाले असले तरी राष्ट्रवादीच्या नगरेसवकांमध्येही प्रभाग रचनेवरून नाराजी निर्माण झाली आहे.

पुणे - पुणे महापालिकेच्या (Pune Municipal) प्रारूप प्रभाग रचनेचा (Ward Structure) फटका केवळ भाजपला (BJP) बसला असे चित्र निर्माण झाले असले तरी राष्ट्रवादीच्या (NCP) नगरेसवकांमध्येही (Corporator) प्रभाग रचनेवरून नाराजी निर्माण झाली आहे. त्यांची खदखद थेट राष्ट्रवादी काँग्रेसच्या बैठकीतमध्येच नगरसेवकांनी व्यक्त करत स्वबळावर निवडणूक नको असे बैठकित सांगितले.

प्रारूप प्रभाग रचना जाहीर झाल्यानंतर राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष प्रशांत जगताप यांनी ही प्रभाग रचना राष्ट्रवादीला अनुकूल आहे, आमचे १२२ नगरसेवक स्वबळावर निवडून येतील असा दावा केला होता. मात्र, आठवड्याभरानंतर राष्ट्रवादीतील नगरसेवकांमध्ये चलबिचल वाढली असून, प्रमुख नगरसेवकांनी स्वतःचे प्रभाग सुरक्षीत केले, पण आमचा विचार केला नाही अशी भावना नगरसेवक व्यक्त केली आहे.

NCP
पुणे जिल्ह्यात मंगळवारी १,९०६ नवे कोरोना रुग्ण; १२ जणांचा मृत्यू

राष्ट्रवादी काँग्रेसने पक्षाच्या आमदार, प्रमुख नगरसेवक, माजी महापौर, माजी स्थायी समिती अध्यक्ष यांच्यासह काही प्रमुख पदाधिकाऱ्यांची बैठक सोमवारी (ता.७) घेतली. यातील बहुतांश जणांनी प्रभाग रचनेवर नाराजी व्यक्त केली. राष्ट्रवादीसाठी प्रभाग रचना सुरक्षीत असल्याचे सांगितले तरी ती कशाप्रकारे चुकीची आहे हे पदाधिकाऱ्यांनी आकड्यांनिशी सांगितले.

आमदारांच्या भावाला सुरक्षीत करण्यासाठी माझा प्रभाग तोडगा असे वडगाव शेरीतील पदाधिकाऱ्याने सांगितले. तर वारजे भागात राष्ट्रवादीचे प्राबल्य असतानाही तेथील तिन्ही विद्यमान नगरसेवकांनी नाराजी व्यक्त केली.

धनकवडी, हडपसर येथे राष्ट्रवादीचे पूर्ण पॅनेल निवडून येईल अशी स्थिती आहे, पण याठिकाणीही चुकीची रचना केली आहे. स्वतःच्या निकटवर्तीयांना निवडून आणण्यासाठी पक्षाच्या कार्यकर्त्यांवर अन्याय केला आहे अशी भावना काही नगरसेवकांनी व्यक्त केली आहे.

त्यामुळे आगामी निवडणूक स्वबळावर लढविण्याचे मत शहराध्यक्षांनी व्यक्त केले असले तरी आम्हाला शक्य नाही. निवडणुकीसाठी आघाडी करावी असे बहुतांश पदाधिकाऱ्यांचे मत आहे. त्यामुळेच निवडणुकीबाबत उपमुख्यमंत्री अजित पवार यांनीच निर्णय घ्यावा असा निर्णय या बैठकीत झाला आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.