Pune Crime News : पुणे हादरलं! सुप्रिया सुळेंच्या निकटवर्तीय माजी नगरसेवकाची कोयता-कुऱ्हाडीने हत्या

NCP Former corporator mehboob pansare killed over land dispute in Jejuri Pune Crime news
NCP Former corporator mehboob pansare killed over land dispute in Jejuri Pune Crime news
Updated on

जेजुरी नगरपरिषदेचे राष्ट्रवादीचे माजी नगरसेवक महेबुब पानसरे यांच्यावर चार ते पाच जणांनी कोयता कुऱ्हाडीने करून हत्या केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. या घटनेने पुण्यात खळबळ उडाली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार महेबुब पानसरे यांच्यावर चार ते पाच जणांनी हल्ला केला. या घटनेत पानसरे हे गंभीरित्या जखमी झाले होते. त्यांनंतर त्यांना तातडीने उपचारासाठी पुणे येथील रुग्णलयात दाखल करण्यात आले. मात्र रुग्णालयात डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले. दरम्यान याप्रकरणी पोलिसांनीपाच जणांविरोधात गुन्हा दाखल केला आहे.

NCP Former corporator mehboob pansare killed over land dispute in Jejuri Pune Crime news
Maharashtra Rain Updates : छत्री घेऊनच घराबाहेर पडा! राज्यात मुंबई-पुण्यासह 'येथे' आज मुसळधार पाऊस

या प्रकरणी वनेश प्रल्हाद परदेशी, किरण वनेश परदेशी, स्वामी वनेश परदेशी यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दरम्यान शेतजमिनीच्या वादातून पानसरे यांची हत्या झाल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे. दरम्यान मेबबुब पानसरे हे राष्ट्रवादीच्या खासदार आणि कार्याध्यक्ष सुप्रिया सुळे यांचे निकटवर्तीय मानले जातात.

NCP Former corporator mehboob pansare killed over land dispute in Jejuri Pune Crime news
Pankaja Munde BJP Update : मला कंटाळा आलाय! पंकजा मुंडे घेणार ब्रेक... राजकीय भूकंपानंतर मोठा गौप्यस्फोट

पानसरे सुप्रिया सुळेंचे निकटवर्तीय

मेहबूब पानसरे यांची नाझरे धरण परिसरात शेती आहे. मेहबूब पानसरे यांचे वनेश परदेशी यांच्यात शेतजमिनीबाबत जुना वाद सुरू होता. दरम्यान पानसरे शुक्रवारी सायंकाळी साडेपाच वाजेच्या सुमारास शेतातील मशागतीचे काम पाहण्यासाठी गेले होते. यावेळी पाच जणांनी मेहबूब पानसरे आणि इतर दोघांवर कुऱ्हाड आणि कोयत्याने वार केले. साम टीव्हीने याबद्दलचे वृत्त दिले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.