Sharad Pawar : अजित पवारांना बाल्लेकिल्ल्यात धक्का? पिंपरी चिंचवडच्या माजी महापौरांनी घेतली शरद पवारांची भेट

NCP leader azambhai pansare meets Sharad Pawar in Pune Amide ncp crisis political news
NCP leader azambhai pansare meets Sharad Pawar in Pune Amide ncp crisis political news
Updated on

पुणे : राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात उभी फूट पडल्यानंतर राष्ट्रवादी पक्षात शरद पवारांचा एक आणि अजित पवारांचा दुसरा गट तयार झाल्याचे पाहायला मिळाले. दरम्यान सध्या या दोन गटापैकी राष्ट्रवादी पक्षाते नाव कोणाचा आणि घड्याळ हे निवडणूक चिन्ह कोणाला मिळणार यावरून दोन गटात केंद्रीय निवडणूक आयोगासमोत सुनावणी सुरू आहे. यादरम्यान उपमुख्यमंत्री अजित पवारांच्या बालेकिल्ला पिंपरी चिंचवडमधून आणखी एक घडामोड समोर आली आहे.

पुणे आणि पिंपरी चिंचवड या दोन्ही शहरात अजित पवार यांचा प्रभाव मोठा आहे. नुकतेच अजित पवारांना पुण्याचे पालकमंत्रीपद देखील देण्यात आले आहे. यादरम्यान आज पिंपरी चिंचवड शहराचे माजी महापौर आझम पानसरेंनी राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवारांची पुण्यात भेट घेतली आहे. यावरून राजकीय चर्चांना उधाण आले आहे.

NCP leader azambhai pansare meets Sharad Pawar in Pune Amide ncp crisis political news
Gauri Khan Birthday : किंग खानची पत्नी गौरी त्याच्यापेक्षाही 'रईस', चक्क 'एवढ्या' कोटींची मालकीण!

आझम पानसरे यांचा मुलगा निहाल पानसरे हा अजित पवारांच्या पाठीशी उभा होता. पण आज वडील आझम पानसरे यांनी शरद पवारांची भेट घेतली, त्यामुळं आझम पानसरे लवकरच शरद पवारांना पाठिंबा दर्शवतील असा दावा केला जात आहे.

या भेटीवेळी शरद पवारांच्या राष्ट्रवादीचे पिंपरी चिंचवडचे शहराध्यक्ष तुषार कामठे हे देखील त्यांच्यासोबत होते. दरम्यान आझम पानसरेंनी जर शरद पवारांना पाठिंबा जाहीर केला तर हा अजित पवारांसाठी मोठा धक्का असेल असे मानले जात आहे.

NCP leader azambhai pansare meets Sharad Pawar in Pune Amide ncp crisis political news
Supriya Sule: भाजपने फडणवीसांवर अन्याय केलाय, मला प्रचंड दु:ख वाटतं; सुप्रिया सुळेंचा टोला

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.