Sharad Pawar: 2000च्या नोटबंदीवर शरद पवारांची खोचक प्रतिक्रिया; म्हणाले, लहरी माणसानं...

सुरुवातीला चमत्कार होईल असं त्यांना वाटतं होतं पण चमत्कार एवढाच झाला की...
Sharad Pawar
Sharad Pawaresakal
Updated on

पुणे : रिझर्व्ह बँक ऑफ इंडियानं (RBI) 2000 रुपयांची नोट चलनातून मागं घेण्याचा निर्णय घेतला. बँकेच्या या निर्णयावर राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वोसर्वा शरद पवार यांनी प्रतिक्रिया दिली आहे. एखाद्या लहरी माणसानं निर्णय घ्यावा तसा निर्णय घेतला गेला आहे, अशा खोचक शब्दात त्यांनी टीका केली आहे. (Sharad Pawar first reaction about withdrawal of 2000 note by RBI)

Sharad Pawar
Manipur Violence: मणिपूरात पुन्हा उफाळला हिंसाचार! इंफाळमध्ये जमावाचा धुडगूस, अनेक घरं पेटवली

पवार म्हणाले, नोटबंदीबाबत माझ्याकडं काही तक्रार आलीच तर विरोध कमी होईल यासाठी हा निर्णय घेण्यात आला आहे. यासंबंधी जो ताजा निर्णय घेतलाय तो एखाद्या लहरी माणसानं निर्णय घ्यावेत असा घेतलेला दिसतोय. मागे अशाच प्रकारचा निर्णय घेतला तर त्यात खूप लोकांचं नुकसान झालं.

Sharad Pawar
Tushar Bhosale: त्र्यंबकेश्वर वादावर तुषार भोसलेंनी उकरुन काढला नवा वाद; आरोपीबाबत केला मोठा दावा

पुणे जिल्ह्याबाबत सांगायचं झाल्यास पुणे जिल्ह्यात सहकारी बँकेत त्या काळात काही कॅश होती. काही कोटींमधील ही रक्कम बदलून देण्याची जबाबदारी असताना ती बदलून दिली गेली नाही. पुणे जिल्हा बँकेचं त्यात आर्थिक नुकसान झालं, असंच कोल्हापूरच्या मध्यवर्ती बँकेचंही झालं.

Sharad Pawar
Marriage News: भर मंडपातून पळून गेला नवरदेव! नवरीनं पाठलाग करुन पकडलं अन्...; वाचा अजब लग्नाची गजब गोष्ट

म्हणजे निर्णय घ्यायचे आणि हे निर्णय घेतल्यानंतर ज्यांची गुंतवणूक आहे, त्यांना बदल करुन द्यायची जबाबदारी पाळायची नाही आणि आम्ही काही वेगळं करतो असं दाखवायचं. सुरुवातीच्या काळात असं सांगण्यात आलं या नोटा आज संध्याकाळपासून बंद होतील आणि देशात चमत्कार होईल.

पण देशात चमत्कार एवढाच झाला की, अनेक लोकांनी आत्महत्या केल्या. अनेक कुटुंब आणि व्यावसायिक हे उद्धवस्त झाले. हे चमत्कार केल्यानंतर आता पुढे काय म्हणून हा दुसरा चमत्कार केलेला आहे. बघुयात याचं पुढे काय होतंय, अशा शब्दांत शरद पवार यांनी सरकारवर टीका केली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.