Raj Thackeray News: राज ठाकरेंना मुख्यमंत्री करण्यासाठी राष्ट्रवादीच्या नेत्याने सांगितला फार्मुला; चर्चांना उधाण

Raj Thackeray News: "महाराष्ट्राच्या जनतेच्या मनातील भावी मुख्यमंत्री"
NCP leader told the formula to make Raj Thackeray the Chief Minister
NCP leader told the formula to make Raj Thackeray the Chief Minister esakal
Updated on

Raj Thackeray News: बुधवारी गुढीपाडव्यानिमित्त राजकीय विविध पक्षांचे शुभेच्छांचे बॅनर लागले होते. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने देखल मुंबईत बॅनरबाजी केली होती. काल (बुधवारी) शिवतीर्थवर मनसेचा मेळावा पार पडला.

या पार्श्वभूमीवर मनसेकडून राज ठाकरे यांचे भावी मुख्यमंत्री म्हणून उल्लेख असणारे पोस्टर सेना भवनसमोर लावण्यात आले होते. दरम्यान या बॅनरवरून राष्ट्रवादीचे पुणे शहर अध्यक्ष प्रशांत जगताप यांनी ट्विट करत राज ठाकरेंनी डिवचलं आहे.

NCP leader told the formula to make Raj Thackeray the Chief Minister
Modi Surname Case: "मोदी हटाओ देश बचाओ" राहुल गांधींच्या शिक्षेचे पडसाद पुण्यात

जगताप यांनी ट्विटमध्ये म्हटलं आहे की, "राज ठाकरेंना मुख्यमंत्री करण्यासाठी विधानसभेतील आमदारांची संख्या 288 ऐवजी 1 करावी लागेल. तो एकमेव आमदारही 3-4 वर्षात पाठींबा काढून सरकार पाडेल." त्यामुळे आता मनसे कडून यावर काय प्रतिक्रिया येते हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.(Latest Marathi News)

दरम्यान "महाराष्ट्राच्या जनतेच्या मनातील भावी मुख्यमंत्री..! हिंदुजननायक राज ठाकरे" या आशयाचे बॅनर सेनाभवना समोर लावण्यात आले होते. दादर उपशाखाध्यक्ष लक्ष्मण पाटील यांनी हे बॅनर लावले होते.

NCP leader told the formula to make Raj Thackeray the Chief Minister
Maharashtra Budget Session: उद्धव ठाकरेंनी 'त्या' व्हिडिओवर दिलं स्पष्टीकरण, म्हणाले...

बुधवारी झालेल्या मेळाव्यातून राज ठाकरे यांनी सत्तधारी आणि विरोधकांवर जोरदार हल्लबोल केला. तसेच शिवसेनेतून राज ठाकरे बाहेर का पडले यांचा एक किस्सा त्यांनी सांगितला. तसेच अनाधिकृत मशिद बांधण्याचा प्रयत्न राज्याच अनेक ठिकाणी चालू आहे. यावरून देखील त्यांनी सरकारला अल्टीमेटम दिला.(Latest Maharashtra News)

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.