Pune Politics: पुण्यातील आजी-माजी आमदारांनी एकमेकांच्या विरोधात थोपटले दंड

पुण्यातील भाजप राष्ट्रवादीच्या आजी-माजी आमदारांमध्ये जुंपली
Pune Politics
Pune PoliticsEsakal
Updated on

पुण्यातील राजकारण सध्या जोरदार तापलेलं दिसुन येत आहे. विद्यमान आमदार सुनील टिंगरे यांनी मतदार संघातील विविध विकास कामे होत नाही, प्रशासन सहकार्य करत नाही म्हणून आजपासुन उपोषण सुरू केलं आहे. याच पार्श्वभूमीवर प्रशासनाच्या विरोधात जोरदार हल्लाबोलही सुनील टिंगरे यांनी केला आहे. याच आरोपांवर भाजपचे माजी आमदार जगदीश मुळे मुळीक यांनी पत्रकार परिषद घेत सुनील टिंगरे हे स्टंटबाजी करत असल्याचा आरोप करत पलटवार केला आहे.

निष्क्रिय आमदार म्हणून सुनील टिंगरे यांची ओळख असल्याचा नवा आरोपही जगदीश मुळीक यांनी सुनील टिंगरे यांच्यावर केला आहे. आगामी विधान सभा निवडणुकीला जवळपास दोन वर्षे बाकी आहे. त्यापूर्वी पुण्यात राजकीय वातावरण चांगलंच तापलं असून आरोप प्रत्यारोपांच्या तोफा सुरू झाल्या आहे. त्यामुळे मुद्दा जरी विकासकामांचा असला तरी दुसरीकडे मात्र राजकीय आरोप प्रत्यारोप सुरू असल्याचे दिसून येत आहे.

मतदारसंघातील प्रलंबित कामांसाठी राष्ट्रवादीचे आमदार सुनील टिंगरे यांचे आज पासून उपोषण सुरू केलं आहे. वडगाव शेरीचे आमदार असलेले सुनील टिंगरे यांनी महापालिकेसमोर आंदोलन सुरू केलं. यामध्ये मतदारसंघातील वाहतूक कोंडी, पाणी प्रश्नांसंदर्भात आंदोलन केले जात आहे.

Pune Politics
Crime News: अंध पतीसमोरच अंध पत्नीवर तीन वेळा अत्याचार, मदतीच्या बहाण्याने...

आमदार सुनील टिंगरे यांनी प्रशासनावर गंभीर आरोप केले आहे. यामध्ये सातत्याने बैठका, प्रत्यक्ष भेट आणि पत्रव्यवहाराच्या माध्यमातून पाठपुरावा करूनही प्रशासनाचे मागण्यांकडे दुर्लक्ष असल्याचा आरोप केला आहे. नाराजी व्यक्त करत सुनील टिंगरे आक्रमक झाले आहे. तर दुसरीकडे याच आरोपांवर भाजपचे माजी आमदार जगदीश मुळीक यांनी सुनील टिंगरे यांच्यावर सडकून टीका करत प्रशासनावरील आरोप फेटाळून लावले आहेत. पत्रकार परिषदेत जगदीश मुळीक यांनी सुनील टिंगरे यांचे उपोषण नसून नौटंकी असल्याचा आरोपही यावेळी केला आहे.

Pune Politics
Gautami Patil: व्हायरल झालेल्या 'त्या' विकृत घटनेनंतर गौतमी पाटील म्हणते आता मी...

यावेळेला जगदीश मुळीक म्हणाले सुनील टिंगरे यांचे उपोषण म्हणजे त्यांचं अपयश आहे. सुनील टिंगरे यांना साडे तीन वर्षे एकही मोठं विकास काम करता आलं नाही. सुनील टिंगरे यांची निष्क्रिय आमदार म्हणून ओळख आहे असा टोला मुळीक यांनी लगावला आहे.

विकास कामाचे श्रेय लटण्याचं काम आमदारांनी केलं आहे. लोकांची दिशाभूल करण्याचं काम सुरू केलं आहे. उपोषणाची नौटंकी करण्याचं केलं जातं आहे. टिंगरे यांचे ज्या बांधकाम व्यावसायिकांशी आर्थिक संबध आहेत, त्या बांधकाम व्यावसायिकांची आयकर विभागाकडे तक्रार करणार आहोत असंही जगदीश मुळीक यांनी म्हंटलं आहे.

Pune Politics
Shivsena: आनंद दिघेंचं झालं, तेच रोशनी शिंदेंचं होण्याची भीती, शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांनी केली ‘ही’ मागणी

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.