पुणे - राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाचे शहराध्यक्ष दीपक मानकर यांना विधानसभेसाठी संधी न दिल्यामुळे नाराज असलेल्या मानकर यांच्या आणखी अडीचशे पदाधिकाऱ्यांनी गुरुवारी राजीनामे दिले. त्यामुळे पक्षाच्या विविध पदांवरुन राजीनामे देणाऱ्यांची संख्या आता ८५० वर पोचली असुन शनिवारपर्यंत ही संख्या वाढण्याची शक्यता आहे.