हडपसर - महागाई, बेरोजगारीसारख्या समस्यांनी महाराष्ट्र ग्रासलेला आहे. खोटी आश्वासाने देऊन सरकारकडून जनतेची फसवणूक केली जात आहे. फसव्या योजना लोकांपर्यंत पोहोचविण्यासाठी पगारी तरूण कामाला लावले जाणार आहेत. त्यामुळे केवळ दिशाभूल करणारे हे फसवे सरकार हद्दपार करून आता महाविकास आघाडी सरकार सत्तेत आणण्यासाठी कार्यकर्त्यांनी कामाला लागावे, असे आवाहन राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी केले.