Sharad Pawar : आता मिशन बारामती विधानसभा, खुद्द शरद पवार उतरले मैदानात; अशी सुरू झालीय तयारी...

Sharad Pawar Baramati Visit : शरद पवार यांनी आता बारामतीवर लक्ष केंद्रीत केले असून आगामी विधानसभा निवडणुकीसाठी त्यांनी पुर्नबांधणी सुरु केल्याचे दिसत आहे.
Sharad Pawar Ajit Pawar
Sharad Pawar Ajit PawarSakal
Updated on

बारामती, ता. 18- लोकसभा निवडणुकीनंतर ज्येष्ठ नेते शरद पवार यांनी आता बारामतीवर लक्ष केंद्रीत केले असून आगामी विधानसभा निवडणुकीसाठी त्यांनी पुर्नबांधणी सुरु केल्याचे दिसत आहे. मागच्या आठवड्यात शरद पवार यांनी बारामतीत व्यापारी मेळावा घेतला होता, त्या पाठोपाठ डॉक्टर व वकील मंडळींचाही मेळावा झाला होता. लोकसभा निवडणूकीत बारामती विधानसभा मतदारसंघाने खासदार सुप्रिया सुळे यांना मताधिक्य दिल्यानंतर शरद पवार यांनी बारामतीवर अधिकचे लक्ष केंद्रीत केले आहे.

गेली अनेक वर्षे बारामतीत अजित पवार हेच पूर्ण कामकाज चालवित होते. मध्यंतरी त्यांनी वेगळी भूमिका घेत भाजपसोबत जाण्याचा निर्णय घेतला, त्यानंतर लोकसभेत सुप्रिया सुळे यांच्या विरोधात सुनेत्रा पवार यांची उमेदवारी अजित पवार यांनी दिली. त्या नंतर शरद पवार यांनीही वेगाने बारामती तालुक्यात पक्षबांधणी सुरु केली.

लोकसभा निवडणुकीत शरद पवार यांच्या मागे बारामतीकर उभे राहिल्याचे निकालातून स्पष्ट झाल्यानंतर आता पवार यांनी बारामती तालुका पिंजून काढण्याचा निर्णय घेतला आहे. मंगळवारी (ता. 18) पुण्याहून शरद पवार थेट निंबूत येथे येतील, तेथून करंजेपूल, त्यानंतर वडगाव निंबाळकर व को-हाळे येथे शेतकरी संवाद होईल. त्या नंतर माळेगावमध्ये जाहीर सभा होईल. बुधवारी (ता. 19) सांगवी, खांडज, नीरावागज, डोर्लेवाडी, काटेवाडी व पिंपळी येथे ते शेतकऱ्यांशी संवाद साधणार आहेत. गुरुवारी (ता. 20) पणदरे, लाटे, लोणीभापकर व मोरगाव येथे ते शेतकरी संवाद साधतील.

Sharad Pawar Ajit Pawar
Sangola Accident: मोठी बातमी! सांगोल्यात पाच महिलांना ट्रकने चिरडले

सलग तीन दिवस बारामती तालुक्यातील महत्वाच्या गावात स्वतः शरद पवार मैदानात उतरून शेतक-यांशी संवाद साधणार आहेत. त्यांच्या या दौ-याकडे आगामी विधानसभेच्या निवडणूकीची तयारी म्हणून पाहिले जात आहे.

अजित पवार यांच्या विरोधात विधानसभेला शरद पवार युगेंद्र पवार यांना उतरविणार की आणखी कोणाला संधी देणार या कडे आता राजकीय वर्तुळाचे लक्ष लागून राहिले आहे. एक मात्र निश्चित आहे की शरद पवार यांनी बारामतीचा संपर्क ज्या गतीने वाढविलेला आहे, तो पाहता आगामी विधानसभा निवडणूक पूर्ण ताकदीने लढविण्याचा त्यांचा मनोदय स्पष्टपणे दिसत आहे.

Sharad Pawar Ajit Pawar
Bima Bharati: आधी सुपारी अन् हत्येनंतर दिली मटण पार्टी; पाच वेळच्या महिला आमदाराच्या लेकाची पळापळ

सुप्रिया सुळे यांनीही विधानसभेसोबतच सर्वच निवडणूका ताकदीने लढविणार असल्याचे या अगोदरच स्पष्ट केलेले आहे. नव्याने संघटना बांधणी करुन पुन्हा या तालुक्यात कार्यकर्त्यांना आपलेसे करण्याचा जोरदार प्रयत्न यातून सुरु आहे.

- मिलिंद संगई, बारामती.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.