Pune Rain: 'भाजपाने पुण्यात समुद्रही आणून दाखवला!', पुण्यातील पाणी साचण्यावर राष्ट्रवादीच्या नेत्याचा हल्लाबोल

Pune Rain: पुण्यात समुद्र नाही याची पुणेकरांना कायम खंत होती म्हणूनच की काय भाजपाने पुण्यात समुद्रही आणून दाखवला!, अशी टीका करण्यात आली आहे.
Pune Rain
Pune RainEsakal
Updated on

राज्याच्या अनेक भागात मुसळधार पावसाने हजेरी लावली. दरम्यान काल पुण्यासह परिसरात अचानक आलेल्या मुसळधार पावसाने नागरिकांची चांगलीच तारांबळ उडाली. तर शहर परिसरातील अनेक ठिकाणच्या सखल भागात पाणी साचल्याच्या घटना समोर आल्या. तर अनेकांच्या घरात पाणी शिरल्याने त्यांना मोठी कसरत करावी लागली. काल झालेल्या मुसळधार पावसामुळे संपूर्ण पुणे शहर जलमय झाल्याचे दिसून आले. अनेक ठिकाणी वाहतुकीवर देखील परिणाम झाल्याचे दिसून आले. या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाकडून सत्ताधाऱ्यांवर कडाडून टीका करण्यात आली आहे.

राष्ट्रवादीचे नेते जयंत पाटील यांनी सोशल मिडीया एक्स वरती पोस्ट लिहीत पुण्याचे पावसातील फोटो शेअर करत सत्ताधाऱ्यांवर हल्लाबोल केला आहे. ‘पुण्यात समुद्र नाही याची पुणेकरांना कायम खंत होती म्हणूनच की काय भाजपाने पुण्यात समुद्रही आणून दाखवला!’ अशा शब्दांत जयंत पाटील यांनी सत्ताधाऱ्यांवर हल्लाबोल केला आहे.

सोशल मिडीयावरील पोस्टमध्ये काय म्हणालेत जयंत पाटील ?

काल पुण्यामध्ये झालेल्या मुसळधार पावसात संपूर्ण पुणे शहर जलमय झाल्याची दृश्ये मी पाहिली. रस्त्यांवरून अक्षरशः नद्या वाहत होत्या. संपूर्ण चौकच्या चौक पाण्यात बडून गेले होते. अनेक चार चाकी गाड्या देखील पाण्यात पूर्णपणे बुडाल्या होत्या. अवघ्या दोन तासांच्या पावसात पुणे शहराची ही अवस्था झालेली आहे.

Pune Rain
Oath Ceremony : राष्ट्रवादी काँग्रेसच्या वाट्याला एकही मंत्रिपद नाही?, तटकरेंच्या निवासस्थानी खलबतं, बैठकीसाठी फडणवीस तातडीने दाखल

पुणे महानगरपालिकेमध्ये सलग पाच वर्ष सत्तेत राहून तत्कालिन सत्ताधाऱ्यांनी काय विकास केला हे आज सिद्ध झाले. पुण्यात समुद्र नाही याची पुणेकरांना कायम खंत होती म्हणूनच की काय भाजपाने पुण्यात समुद्रही आणून दाखवला!

पुण्यात विविध भागांत साचलं पाणी

पुण्यात शनिवारी झालेल्या पावसामुळे शहरात विविध भागात पाणी साचल्याचं दिसून आलं, याचा परिणाम वाहतुकीवरही झाला होता. अवघ्या तीन तासांच्या पावसाने शनिवारी ठिकठिकाणी पाणी साठून पुणेकरांची दैना उडाली. चव्हाणनगर, धानोरी, कळस, विश्रांतवाडी अशा अनेक भागांत घरे, दुकाने, सोसायट्यांमध्ये पाणी गेले. अनेक ठिकाणी वाहनांबरोबर माणसे पाण्यातून मार्ग काढताना जीव धोक्यात घालत होती.

Pune Rain
PM Oath ceremony : पुण्यासाठी भाजपचा मेगाप्लॅन! मुरलीधर मोहोळ यांना मंत्रिपदाची लॉटरी? PMO मधून फोन...

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.