Sharad Pawar: ईडीकडून एकाही भाजप नेत्यावर कारवाई नाही; शरद पवारांनी आकडेवारीसह सगळंच बाहेर काढलं

NCP sharad pawar pc in pune: खासदार शरद पवार यांनी आज पुण्यात पत्रकार परिषद घेत महत्त्वाच्या विषयांवर भाष्य केलं आहे.
sharad pawar
sharad pawar
Updated on

पुणे- खासदार शरद पवार यांनी आज पुण्यात पत्रकार परिषद घेत महत्त्वाच्या विषयांवर भाष्य केलं आहे. निवडणुकीचा कार्यक्रम कधी जाहीर होईल याची वाट पाहतोय. १५, १६ किंवा १७ तारखेला निवडणूक आयोग कार्यक्रम जाहीर करेल असं दिसतंय. निवडणूक आयोगाच्या एका सदस्याने राजीनामा दिला. त्याची कारणमीमांसा जाहीर केली नाही. त्यामुळे आम्हाला निवडणूक यंत्रणेबाबत काळजी वाटते, असं ते म्हणाले.

देशातील यंत्रणेचा वापर नेत्यांचा विरोधात इतक्या मोठ्या प्रमाणात कधीही केला जात नव्हता. ईडी, सीबीआय किंवा अन्य यंत्रणांचा विरोधी नेत्यांना दाबण्यासाठी केला जातोय. यंत्रणाचा गैरवापर केला जात आहे. कर्नाटकातील एका व्यक्तीला अटक करण्यात आली. पण, कोर्टाने काँग्रेसचे डीके शिवकुमार यांची निर्दोष सुटका केली. यातून स्पष्ट होतंय की, ईडीचा चुकीच्या पद्धतीने वापर केला जात आहे, असं पवार म्हणाले.

sharad pawar
Sharad Pawar vs Ajit Pawar: ‘तेव्हा मला शरदचा फोन आला...’, Saroj Patil यांनी सांगितला किस्सा

महाराष्ट्रातही ईडीचा गैरवापर

महाराष्ट्रातही असा प्रकार घडत आहे. अनिल देशमुखांवरही अशीच कारवाई करण्यात आली आहे. आता रोहित पवारांवर देखील कारवाई करण्यात येत आहे. साखर कारखाना विकायला सरकार आणि बँकेने काढला होता. ज्याने जास्त बोली लावली त्याला कारखाना देण्यात आला. याप्रकरणात जाणूनबुजून एका सक्रीय कार्यकर्त्याला थांबवण्यासाठी, दहशत निर्माण करण्यासाठी ही कारवाई करण्यात आली आहे, असंही ते म्हणाले.

शरद पवारांनी ईडीचं सगळंच काढलं!

सक्तवसुली संचालनालयाच्या ५ हजार ९०६ कारवायांपैकी केवळ २५ कारवायांचा निर्णय झाला आहे. गेल्या अकरा वर्षामध्ये ईडीने १४१ नेत्यांची चौकशी केली. त्यातील ८५ टक्के नेते हे विरोधी पक्षातील नेते होते. तसेच ११५ नेत्यांवर कारवाई झाली ते सगळे बिगरभाजपचे होते. यातील २४ काँग्रेसचे, १९ तृणमूल काँग्रेसचे आहेत, राष्ट्रवादीचे १८ आहेत, शिवसेनेचे आठ आहेत. डीएमके ६, आरजेडी ५, समाजवादी पार्टी ५, सीपीएम ५, आप ३, नॅशनल कॉन्फरन्स २, मनसे १, पीडीपी २, एआयडीएमके १ आणि टीआरएस १ पक्षातील नेत्यांचा समावेश आहे.

१२१ नेत्यांवर कारवाई करण्यात आली आहे. यात एक मुख्यमंत्री, एक माजी मुख्यमंत्री, विरोधी पक्षातील १४ मंत्री, २४ खासदार, २१ आमदार, ७ माजी खासदार, ११ माजी आमदार अशा नेत्यांवर कारवाई करण्यात आली आहे. ईडीकडून कारवाई करण्यात आलेल्यांमध्ये एकही भाजपचा नेता नाही असं शरद पवारांनी सांगितलं.

sharad pawar
Rahul Gandhi, Sharad Pawar Nashik Daura: शरद पवार, राहुल गांधी यांच्या सभेस रेकॉर्ड ब्रेक गर्दी होणार : पानगव्हाणे

काँग्रेसच्या २००४ ते २०१४ या काळात ईडीने २६ जणांवर कारवाई केली आहे. या २४ मध्ये काँग्रेसचे पाच नेते आहेत, तर भाजपचे ३ नेते आहेत. यावरुन असं दिसतंय ही यूपीएच्या काळात ईडी राजकीय हेतूने वागत नव्हती. त्या पद्धतीने कारवाई करत नव्हती. त्यामुळे ईडी हा भाजपचा एक सहकारी पक्ष ठरला आहे. ईडी कधी कारवाई करणार, कोणावर करणार हे सगळं भाजप नेत्यांना माहिती असतं, असं शरद पवार म्हणालेत. (Latest Marathi News)

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.