राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनो, निवडणुका ताकतीने लढवण्याची तयारी करा : वळसे-पाटील

Dilip_Walse_Patil
Dilip_Walse_Patil
Updated on

मंचर (पुणे) : “आंबेगाव तालुक्यात जाहीर झालेल्या सर्व जागा लढविण्याच्या दृष्टीने जोरदार तयारी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या कार्यकर्त्यांनी करावी. राज्य पातळीवर अजून ग्रामपंचायत निवडणुकांविषयी आघाडीबाबतचा निर्णय झालेला नाही. राज्यस्तरावर आघाडीबाबतचा निर्णय झाला, तर त्या निर्णयाप्रमाणे गावपातळीवर निर्णय घेऊ,” असे राज्याचे कामगार मंत्री दिलीप वळसे पाटील यांनी सांगितले. 

मंचर (ता.आंबेगाव) येथे रविवारी (ता.20) ग्रामपंचायत निवडणूकांच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी कॉंग्रेस कार्यकर्त्यांच्या बैठकीत वळसे-पाटील बोलत होते. यावेळी ज्येष्ठ नेते बाबुराव बांगर, वसंतराव भालेराव, कैलासबुवा काळे, भीमाशंकर सहकारी साखर कारखान्याचे अध्यक्ष बाळासाहेब बेंडे, सुभाषराव मोरमारे, शिवाजीराव लोंढे, प्रकाश घोलप, सभापती संजय गवारी, उपसभापती संतोष भोर, भगवान वाघ, रमेश खिलारी, अंकित जाधव उपस्थित होते.  

वळसे पाटील म्हणाले, “ग्रामपंचायत सदस्य निवडणूक निकालानंतर सरपंच पद आरक्षण जाहीर होणार आहे. त्यामुळे सदस्य निवडणुकीत सर्व जाती धर्माच्या लोकांना प्रतीनिधीत्व द्या. कारण यापूर्वी काही ग्रामपंचायतीत सदस्यांचे बहुमत असूनही आरक्षण लागू झालेला सदस्य आपल्याकडे नसल्याने विरोधकांचा सरपंच झाल्याची उदाहरणे आहेत. कर्तबगार कार्यकर्त्यांना संधी द्या, गटबाजी मतभेद आणि भांडणे टाळा.

ज्येष्ठ आणि युवकांनी एकत्रित काम करून गावचा पाया भक्कम करा, प्रत्येक पंचायत समिती गणातील ग्रामपंचायत निवडणूकीसाठी  निरीक्षकांच्या नेमणुका केल्या आहेत. निरीक्षक आणि पुणे जिल्हा सहकारी दूध उत्पादक संघाचे अध्यक्ष विष्णू हिंगे यांच्या माध्यमातून निवडणूकीविषयी गाव पातळीवरील प्रश्न मार्गी लावले जातील. यावेळी विष्णू हिंगे, बाजार समितीचे सभापती देवदत्त निकम, पुणे जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष विवेक वळसे पाटील यांची मनोगते झाली. 

“मंचर नगरपंचायत होणार हे निश्चित झाले आहे, नगर विकास खात्याचे मंत्री एकनाथ शिंदे यांनी मुंबई येथे माझ्याकडे वेळ मागितली आहे. दोन दिवसांत मंचर नगरपंचायतबाबत संयुक्त पत्रकार परीषद घेणार आहोत. निवडणूक आयोगाने मंचर ग्रामपंचायतीची निवडणूक पुढे ढकलली असा निर्णय होईपर्यंत कार्यकर्त्यांनी गाफील न राहता निवडणुकीची तयारी कायम ठेवावी.”
- दिलीप वळसे पाटील, कामगार मंत्री

- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

(Edited by: Ashish N. Kadam)

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.