Ajit Pawar : उमेदवारी जाहिर करण्याच्या मागणीसाठी बारामतीत; राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी अजित पवारांची गाडी अडविली...

Ajit Pawar : अजित पवार माळेगाव येथील कार्यक्रम संपवून बारामतीकडे निघाले असताना राष्ट्रवादीच्या अनेक कार्यकर्त्यांनी त्यांचा ताफा अडवला.
NCP workers stopped Deputy Chief Minister Ajit Pawars vehicle in Baramati
ajit pawarsakal
Updated on

बारामती: आगामी विधानसभा निवडणूकीमध्ये तुम्हीच आम्हाला उमेदवार म्हणून हवे आहात, अशी मागणी करत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या कार्यकर्त्यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांची गाडी मंगळवारी (ता. 8) बारामतीत अडविली.

शहरातील कारभारी सर्कल नजिक अजित पवार माळेगाव येथील कार्यक्रम संपवून बारामतीकडे निघाले असताना राष्ट्रवादीच्या अनेक कार्यकर्त्यांनी त्यांचा ताफा अडवला. तुम्ही तुमची उमेदवारी आत्ताच जाहीर करा, असा आग्रह कार्यकर्त्यांनी धरला होता. अजित पवार यांनी कार्यकर्त्यांची समजूत काढण्याचा प्रयत्न केला पण कोणीही ऐकायच्या मनःस्थितीत नव्हते.

यावेळी कार्यकर्त्यांनी जोरदार घोषणाबाजी केली. काही काळ या घोषणाबाजीमुळे अजित पवार यांना देखील बोलता आले नाही. अखेर त्यांनी गाडीतून बाहेर येत तुमच्या मनात जो उमेदवार असेल तोच उमेदवार दिला जाईल असे आश्वासन दिले. आमच्या मनात तुम्हीच उमेदवार आहात तुम्ही तुमची उमेदवारी आत्ताच या क्षणी जाहीर करा, असा आग्रह पश्चिम भागातील कार्यकर्त्यांनी धरला होता.

त्यानंतरही अजित पवार यांनी तुमच्या मनात जो उमेदवार आहे तोच विधानसभेला राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे वतीने घड्याळाच्या चिन्हावर उभा असेल असे सांगितले. कार्यकर्त्यांनी अजित पवार हेच उमेदवार असतील अशी खात्री पटल्यानंतरच त्यांना पुढे जाऊ दिले

त्यानंतर अजित पवार आपल्या पुढील कार्यक्रमासाठी रवाना झाले. दरम्यानच्या काळात पोलिस व सुरक्षा यंत्रणांची चांगलीच धावपळ झाली. अजित पवार यांचा ताफा येण्याअगोदर कार्यकर्त्यांनी कारभारी सर्कल चौकामध्ये जोरदार घोषणा देत अजित पवार यांनीच आपली उमेदवारी जाहीर करावी अशी मागणी केली.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.