आधुनिक संशोधनावर भर देण्याची गरज - लेफ्टनंट अरविंद वालिया

कोरोनामुळे विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान झाले असून यामुळे अनेक आव्हाने निर्माण झाले
आर्मी इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजीचा २८ वा वर्धापन
आर्मी इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजीचा २८ वा वर्धापनsakal
Updated on

पुणे: कोरोनामुळे विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान झाले असून यामुळे अनेक आव्हाने निर्माण झाले आहे. प्रत्यक्ष शिक्षण विद्यार्थ्यांना देणे शक्य नसल्याने बराच कालावधीसाठी ऑनलाइन शिक्षण सुरू ठेवावे लागले. परंतु आता मोठ्या प्रमाणात लसीकरण झाल्याने महाविद्यालये सुरू झाली आहेत. कृत्रिम बुद्धिमत्ता (एआय), सायबर सुरक्षा, रोबॉटिक्स, क्वांटम कॉम्प्युटिंग सारख्या आधुनिक तंत्रज्ञानांना महत्त्व प्राप्त झाले असून त्या दृष्टीने संशोधनावर भर दिला पाहिजे.’’ असे मत लेफ्टनंट जनरल अरविंद वालिया यांनी व्यक्त केले.

आर्मी इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजीचा २८ वा वर्धापन
बारावीच्या वेळापत्रकात अंशत : बदल

दिघी येथील आर्मी इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजीचा २८ वा वर्धापन दिनानिमित्त ते बोलत होते. यावेळी दक्षिण मुख्यालयाचे प्रमुख लेफ्टनंट जनरल जे. एस. नैन आणि लेफ्टनंट जनरल वालिया ऑनलाइन सहभागी झाले होते. या प्रसंगी लेफ्टनंट जनरल सुदर्शन हसबनीस (निवृत्त), एआयटीचे संचालक ब्रिगेडिअर अजय भट्ट (निवृत्त), प्राचार्य डॉ. बी. पी. पाटील आदी उपस्थित होते. यावेळी संस्थेच्या वतीने ‘जीवनगौरव पुरस्कार’ ज्येष्ठ उद्योजक प्रदीप भार्गव यांना प्रदान करण्यात आला. तसेच मराठा चेंबर ऑफ कॉमर्स इंडस्ट्री अँड ऍग्रिकल्चरचे (एमसीसीआय) अध्यक्ष व पिनॅकल इंडस्ट्रीचे मुख्य व्यवस्थापकीय संचालक सुधीर मेहता यांना ‘उत्कृष्ट उद्योजक’ तर ‘उत्कृष्ट युवा उद्योजक’ या पुरस्काराने अकॉप्स सिस्टीम्सचे सहसंस्थापक विजेंद्र यादव यांना गौरविण्यात आले.

आर्मी इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजीचा २८ वा वर्धापन
पुणे : PMPMLकडून कात्रज-सासवड बससेवेचा मुहुर्त

लेफ्टनंट जनरल वालिया म्हणाले, ‘‘जागतिक पातळीवर आधुनिक तंत्रज्ञानात वेगाने प्रगती होत असून केवळ तंत्रज्ञान आत्मसात करण्यात लष्कराची भूमिका मर्यादित राहणार नाही. तर तंत्रज्ञान विकसित करण्यासाठी खासगी क्षेत्रांचा सहभाग ही आगामी काळात दिसून येईल. नविन युद्धनीती ही पूर्वीप्रमाणे केवळ युद्धभूमीवरील राहीली नसून ती तंत्रज्ञानावर अवलंबून आहे. त्यामुळे कृत्रिम बुद्धीमत्ता, अभियांत्रिकी, रोबॉटिक्स, सायबर सुरक्षा आदींना महत्त्व प्राप्त झाले असून विद्यार्थ्यांना यात अभ्यास करण्याच्या दृष्टीने मोठ्या संधी आहेत. कारण शिक्षण हेच जगात बदल घडविण्याचे एकमेव साधन आहे.’’

एआयटीने विविध संस्था, विद्यापीठे तसेच सशस्त्र दलांसोबत सामंजस्य करार करावेत. यामुळे विद्यार्थ्यांना अधिक संधी उपलब्ध होतील. इतकंच नाही तर विद्यार्थ्यांनी संरक्षण क्षेत्रातील विविध समस्या ओळखून त्यासाठीचे तंत्रज्ञान विकसित करण्यावर लक्ष केंद्रित केले पाहिजे. लष्कराला आत्मनिर्भर करण्यासाठी नावीन्य, स्टार्टअप, संशोधन यावर भर देण्याचीगरज आहे. आज लष्करात ही तंत्रज्ञानाचे महत्त्व वाढले असून ही संधी ओळखून विद्यार्थ्यांनी लष्करात दाखल व्हावे. असे लेफ्टनंट जनरल हसबनीस (निवृत्त) यांनी सांगितले.

योगदान देण्याची वृत्ती जोपासावी

आयुष्यात बदल घडविण्यासाठी चांगले शिक्षण, संस्कार घेणे महत्त्वाचे आहे. प्रगती करताना भोवतालच्या लोकांच्या आयुष्यात आनंद पेरण्यासाठी काम केले पाहिजे. त्यातून मिळणारा आनंद अवर्णनीय असतो. आपण पर्यावरण संरक्षण, सामाजिक आणि राष्ट्र उभारणीच्या कार्यात योगदान देण्याची वृत्ती जोपासावी. असे भार्गव म्हणाले.

विद्यार्थ्यांचा सन्मान ः

या प्रसंगी स्वागतिका साहू हिला ‘द चीफ ऑफ आर्मी स्टाफ ऑलराउंडर बेस्ट स्टुडंट’ पुरस्कार प्रदान करण्यात आले. सौम्यकांता खटुआ, रिषभ कुमार सिंग, विशाल नायक व स्वागतिका साहू यांना ‘कमांडर इन चीफ ट्रॉफी’ पारितोषिकाने, अक्षय शर्मा याला ‘राजपूत रेजिमेंट बेस्ट ट्रॉफी फॉर इनोव्हेशन’, अमतुल मस्वारा हिला खेळासाठी ‘जी. राजशेखर मेमोरिअल पुरस्कार’, तर गरिमा देवी हिला 'बेस्ट लायब्ररी यूजर अवॉर्ड'ने सन्मानित करण्यात आले.

‘‘कोरोना काळात खासगी उद्योगांच्या मदतीने संसाधने उपलब्ध करणे अधिक सोपे झाले होते. नावीन्याच्या जोरावर ऑक्सिजन प्रकल्प असो किंवा कोरोना रुग्णांसाठी बेड्स उपलब्ध करणे शक्य झाले. यासाठी नावीन्याची गरज होती. देशाचे भवितव्य हे तरुण पिढीवर अवलंबून आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांनी या अभियांत्रिकी संस्थेत शिक्षण घेताना नावीन्यावर भर देणे गरजेचे आहे.’’

- सुधीर मेहता, अध्यक्ष-एमसीसीआय

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.