International Women's Day : जागतिक महिला दिनी कष्टकरी महिलांची दखल घेण्याची गरज

Women's Day 2024: आपल्या भारत देशात प्रत्येक क्षेत्रात महिलांचा सहभाग मोठा आहे. पुर्वीच्या काळी चूल आणि मूल तसेच गृहीणी इतकीच महिलांची ओळख होती.आज नोकरी, उद्योग व्यावसाय, शेती, विज्ञान, तंत्रज्ञान प्रत्येक क्षेत्रात जिजाऊंच्या लेकी आघाडीवर असल्याचे पहावयास मिळते.
Need to light up working women on International Women Day
Need to light up working women on International Women DaySakal
Updated on

ओझर : आपल्या भारत देशात प्रत्येक क्षेत्रात महिलांचा सहभाग मोठा आहे. पुर्वीच्या काळी चूल आणि मूल तसेच गृहीणी इतकीच महिलांची ओळख होती.आज नोकरी, उद्योग व्यावसाय, शेती, विज्ञान, तंत्रज्ञान प्रत्येक क्षेत्रात जिजाऊंच्या लेकी आघाडीवर असल्याचे पहावयास मिळते.

हे सारे काही क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांनी स्त्री शिक्षणा मुळेच शक्य झाले आहे.परंतू शिक्षणापासून वंचित असलेल्या महिला देखील आपल्या कष्टाच्या जोरावर पुरुषांच्या खांद्याला खांदा मिळून काम करताना पहावयास मिळतात.बांधकाम क्षेत्रात बिगरी कामात ,शेतीकामात तसेच ऊसतोडणीचे काम करणाऱ्या महिला अपार कष्टाच्या जोरावर कुटुंबाच्या उदरनिर्वाहासाठी हातभार लावत आहेत.

ऊस तोडणी काम करणाऱ्या महिलांची पहाटे ४ वाजेपासून दिनचर्या सुरू होते. घरातील स्वयंपाक पाणी करून, मुलाबाळांचा सांभाळ करत शिदोरी बांधून सकाळी दिवस उगवायलाच शेतात हजर असते. ऊसाची तोडणी, मोळी बांधणे,गाडी भरणे या सर्व कामात त्यांचा हातभार तर असतोच.

त्यातूनही कुटुंबप्रमुख व्यसनी असल्यास त्याला सावरत कुटुंबाचा गाडाती रेटतच असते.जीवाची पर्वा नकरता वेळप्रसंगी ऊसाने भरलेली बैलगाडी चालवण्याचे कसबही तिला अवगत आहे. इतके काबाडकष्ट करूही त्यांना त्यांच्या कष्टाचा मोबदला मिळत नाहि हे दुर्दैव आहे. त्यांचा कष्टाचा मोबदला मिळवून देणे हिच खरी जागतिक महिला दिनाची भेट ठरेल.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.