एमपीएससीच्या बदललेल्या निर्णयामुळे गैरसोयच; डॉ. नीलम गोऱ्हे यांनी केली 'ही' मागणी

Neelam Gorhe Demands to change the center for MPSC examination
Neelam Gorhe Demands to change the center for MPSC examination
Updated on

पुणे : सप्टेंबर महिन्यात होणाऱ्या राज्य सेवा पूर्व परीक्षेसाठी केवळ पुणे जिल्हा परीक्षा केंद्र निवडलेल्या उमेदवारांना त्यांच्या मुळ पत्त्याच्या महसुली विभागाच्या ठिकाणी परीक्षा केंद्र बदलून घेता येणार आहे. यामुळे उमेदवारांची गैरसोय होणार आहे. केवळ पुणे नाही तर राज्यातील उमेदवारांना सरसकट परीक्षा केंद्र बदलण्याची मुभा द्यावी असे पत्र विधान परिषदेच्या उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांनी केली आहे. 

बारामतीत कोरोनाचा उद्रेक; एकाच दिवशी 38 रुग्ण पॉझिटीव्ह

बहुतांश विद्यार्थी राज्य सेवेचा अभ्यास पुण्यात करतात, त्यांनी अर्ज भरताना पुणे येथे परीक्षा केंद्र निवडले, पण कोरोना' मुळे बहुतांश विद्यार्थी मराठवाडा, विदर्भ, उत्तर महाराष्ट्र, पश्चिम महाराष्ट्रातील त्यांच्या मुळ गावी गेले आहेत. 'पुणे, मुंबई, औरंगाबाद, येथे कोरोना'चा प्रादुर्भाव जास्त आहे, शिवाय जिल्हा बंदी असल्याने प्रवासाची सोय नाही, त्यामुळे उमेदवारांनी आमच्या आमच्या जिल्ह्यात परीक्षा केंद्र बदलून द्यावेत अशी मागणी केली होती. सुरूवातीला नकार देणाऱ्या एमपीएससीने दबाव वाढल्यानंतर पुणे येथे परीक्षा केंद्र निवडलेल्या उमेदवारांना त्यांच्या महसुल विभागीय कार्यालयाच्या ठिकाणी परीक्षा केंद्र बदलून देण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे केवळ पुणे केंद्र असणाऱ्यांच याचा लाभ घेता येईल. पण तरीही जिल्हा ओलांडून परीक्षेसाठी कसे जायचे हा प्रश्न कायम आहे. या निर्णयावर विद्यार्थ्यांनी प्रश्न उपस्थित केले आहेत. 

मुळशी धरणातून उद्या होणार विसर्ग; मुळा नदीकाठच्यांना सतर्कतेचा इशारा!​

उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांनाही या निर्णयातील त्रुटी लक्षात आल्याने त्यांनीही 'एमपीएससी'ला पत्र लिहून सरसकट परीक्षा केंद्र बदलून देण्याचे निर्देश अध्यक्ष सतीश गवई यांना दिले आहेत. 

महाराष्ट्र मध्ये सध्या कोविड १९ ची रुग्णसंख्या मोठया प्रमाणात वाढत आहे. १४ ऑगस्ट २०२० च्या महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने परिपत्रक काढून २० सप्टेंबर, २०२० रोजी नियोजित परीक्षेसाठी केवळ पुणे जिल्हा निवडलेल्या विद्यार्थ्यांना त्या विद्यार्थ्यांच्या मूळ पत्त्याच्या महसूल विभागीय ठिकाणी परीक्षा केंद्र देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. कोव्हीड-१९ मुळे सर्व जिल्हाधिकारी यांनी आंतर जिल्हा बंदी घातली आहे. पुणे, मुंबई, नाशिक, औरंगाबाद नागपूर ही विभागीय आयुक्त मुख्यालय शहरे ही हॉट स्पॉट आहेत. या ठिकाणाहून येणाऱ्या नागरिकाला विलगीकरण केले जाते. तसेच या शहरात मोठ्या प्रमाणात विद्यार्थी परीक्षेला येणार आहेत त्यामुळे या शहरातील प्रशासकीय यंत्रणेवर मोठ्या प्रमाणात ताण ही येणार आहे. बहुतांश विद्यार्थी हे गरीब घराण्यातील असतात. मोठ्या शहरांमध्ये राहण्याची त्यांची व्यक्तिगत सोयही नसते व त्यामुळे बाहेर राहण्याचा खर्च परवडत नाही.  या सर्व बाबींचा विचार करता महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने परीक्षेची केंद्रे ही जिल्हा मुख्यालाय मध्ये ठेवणे योग्य होणार आहे. ज्या विद्यार्थ्यांच्या मूळ पत्ता असेल त्याच जिल्ह्यात केंद्र उपलब्ध करून घ्यावे. 

बापरे! आंबेगाव तालुक्यातील निम्म्यापेक्षा अधिक गावे कोरोनाग्रस्त!
 

१४ ऑगस्टच्या परिपत्रक मध्ये केवळ पुणे जिल्ह्यात परीक्षा केंद्र निवडलेल्या विद्यार्थ्यांच केंद्र बदलून मिळणार आहे. परंतु ज्या विद्यार्थांनी मुंबई सेंटर निवडले आहे त्यांना या परिपत्रकाचा लाभ होणार नाही. त्यामुळे सरसकट विद्यार्थ्यांना २० सप्टेंबरची राज्यसेवा पूर्व परीक्षा ही जिल्हा मुख्यालय केंद्रावर घेणेबाबत आवश्यक कार्यवाही करावी, असे डॉ. गोऱ्हे यांनी पत्रात नमूद केले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.