हलगर्जीपणा नडला; सरकता दरवाजा, ज्वालाग्राही पदार्थांकडे दुर्लक्ष

हलगर्जीपणा नडला; सरकता दरवाजा, ज्वालाग्राही पदार्थांकडे दुर्लक्ष
Updated on

पिरंगुट : कामगार ज्या खोलीत सॅनिटायझर पॅकिंगचे काम करतात, त्या दोन खोल्या बंदिस्त होत्या. त्यातच उघडायला अडचणीचा ठरणारा सरकता दरवाजा आणि ज्वालाग्राही पदार्थ सुरक्षित ठेवण्याच्या कंपनीच्या हलगर्जीपणामुळे आग लागल्यानंतर कामगारांना बाहेर पडायला संधीच मिळाली नाही आणि त्यातच त्यांना जीव गमवावा लागला.(Negligence for Sliding door and ignoring flammable substances cause Fire at svs aqua technologies)

काही कामगारांनी दिलेल्या माहितीनुसार, उरवडे (ता. मुळशी) येथील एसव्हीएस अक्वा टेक्नॅालॅाजिस कंपनीला आग लागल्यानंतर तातडीने बाहेर पडण्यासाठी जी अत्यावश्यक व्यवस्था पाहिजे होती, ती तेथे नव्हती. पॅकेजिंगचे काम वातानुकूलित वातावरणात सुरू होते. त्यामुळे एसीची सोय करण्यासाठी ही खोली बंदिस्त होती. त्या खोलीचे दरवाजे स्लायडिंगचे असल्याने दरवाजे सरकविण्याची प्रक्रिया तातडीच्या वेळी अडचणीची ठरली. त्यामुळे ज्यावेळी आग लागली, त्यावेळी आगीने क्षणात आक्राळविक्राळ रुप धारण करून संपूर्ण खोली व्यापून टाकली. त्यामुळे कामगारांना बाहेर पडण्याची संधी मिळाली नाही.

याशिवाय, ज्या खोलीत आग लागली तेथे आरएमवन नावाच्या पावडरचे डबे ठेवलेले होते. ही पावडर अतिशय ज्वालाग्राही असल्याने डब्यातून बाहेर पडल्यानंतर तिच्यावर थोडा जरी दाब पडला तरी ती सेकंदात पेट घेते. आग लागण्यापूर्वी या ज्वालाग्राही पावडरच्या डब्यांपैकी एका डब्याला गळती लागलेली होती. त्यामुळे त्या डब्यातील पावडर खोलीत एका क्षणात पसरली आणि तिने पेट घेतला. एका बाजूला बंद दरवाजा तर दुसऱ्या बाजूला एकाच दरवाजात बसवलेले दोन दरवाजे सरकवून उघडायला कामगारांना संधीच मिळाली नाही. त्यामुळे कंपनीत आग विझविण्याची यंत्रणा असूनही तिचा वापर करणे शक्य झाले नाही. सुमारे १५ दिवसांपूर्वीही या कंपनीत काही भागात आग लागल्याचे परिसरातील ग्रामस्थ सांगतात. असे असूनही कंपनी प्रशासनाने त्याकडे काणाडोळा करायला नको होता, अशी चर्चा ग्रामस्थ व कामगार करत आहेत.

हलगर्जीपणा नडला; सरकता दरवाजा, ज्वालाग्राही पदार्थांकडे दुर्लक्ष
धनश्रीचे कुटुंब सांभाळण्याचे स्वप्न राहिले अधुरे

जेसीबीच्या साह्याने तोडल्या बंदिस्त खोल्यांच्या भिंती

पिरंगुट कंपनीत आग लागल्याची घटना सुमारे तीन वाजण्याच्या सुमारास घडली. पोलिस घटनास्थळी १५ मिनिटांत हजर झाले आणि त्याचदरम्यान अग्निशमन दलाला पाचारण करण्यासाठी फोनाफोनी सुरू झाली. दरम्यान बंदिस्त खोल्यांच्या भिंती जेसीबीच्या साह्याने तोडायला सुरवात केली. त्यानंतर आग लागल्यानंतर सुमारे पावणेचार वाजता अग्निशमन दलाच्या तीन गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या. आग विझवायला सुरवात करूनही ती आग आटोक्यात यायला रात्रीचे साडेसात वाजून गेले होते. तरीही काही प्रमाणात आग धुमसत होतीच.या कंपनीतील जे ज्वालाग्राही रसायन आहे, त्यावर जेवढे पाणी मारू तेवढे ते पुन्हा पेट घेते. अग्निशमन दलाच्या पाण्याला प्रेशर असल्याने केवळ त्या प्रेशरमुळेच ही आग मोठ्या प्रयासाने आटोक्यात आणता आली. त्याचवेळेस घटनास्थळी मुळशीचे तहसीलदार अभय चव्हाण, पोलिस निरीक्षक अशोक धुमाळ यांनी धाव घेतली. त्यानंतर प्रांताधिकारी यांनीही मदत कार्याला मार्गदर्शन सुरू केले. परिसरातील आपत्ती व्यवस्थापन पथक, पोलिस, पोलिस मित्र आणि स्थानिक तरुणांनी या मदत कार्याला तातडीने सुरवात केली. सुमारे १५ जणांचे मृतदेह बाहेर काढल्यानंतर जिल्हाधिकारी, जिल्हा पोलिस अधीक्षक, काही लोकप्रतिनिधींनी घटनास्थळी धाव घेऊन मार्गदर्शन केले. त्यानंतर रात्री साडेसात ते आठ वाजण्याच्या सुमारास १७ मृतदेह कोळसा झालेल्या अवस्थेत हाती लागले.

हलगर्जीपणा नडला; सरकता दरवाजा, ज्वालाग्राही पदार्थांकडे दुर्लक्ष
आई कोणा म्हणू मी, कोणास म्हणू बाबा?

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.