PMPML Bus : पीएमपीच्या ताफ्यात ९०० बस लवकरच दाखल होणार

पीएमपीच्या ताफ्यात येत्या काही महिन्यांत ९०० बस दाखल होणार असल्याची घोषणा पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी गुरुवारी येथे केली.
PMP Bus
PMP BusSakal
Updated on

पुणे - पीएमपीच्या ताफ्यात येत्या काही महिन्यांत ९०० बस दाखल होणार असल्याची घोषणा पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी गुरुवारी येथे केली. तसेच कर्मचाऱ्यांना जुलै महिन्यापासून १०० टक्के सातवा वेतन आयोग लागू करणार असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.

सात मीटर लांबीच्या ३०० ई-बसेस भाडेतत्त्वावर तसेच संचालक मंडळाने मान्यता दिलेल्या ३०० बसेस व केंद्र सरकारकडून ३०० बसेस अशा एकूण ९०० बसेस पीएमपीच्या ताफ्यात दाखल होतील, असेही पाटील यांनी स्पष्ट केले. पीएमपीच्या प्रलंबित प्रश्नांबाबत पाटील यांनी गुरुवारी पीएमपीमध्ये बैठक घेतली. त्यानंतर झालेल्या निर्णयांची माहिती त्यांनी पत्रकार परिषदेत दिली. या बैठकीस महापालिका आयुक्त विक्रम कुमार, पिंपरी चिंचवड मनपाचे आयुक्त शेखर सिंग, पुणे महानगर परिवहन महामंडळाचे अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक ओम प्रकाश बकोरिया, पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाचे आयुक्त राहुल महिवाल व पीएमपीएमएलच्या सहव्यवस्थापकीय संचालक प्रज्ञा पोतदार-पवार उपस्थित होते.

पाटील म्हणाले, ‘प्रवाशांना चांगली सेवा देण्यासाठी बसची आवश्यकता आहे. मेट्रो सेवा सुरू होईपर्यंत सात मीटर लांबीच्या ३०० ई-बस पीएमपीच्या ताफ्यात येतील. तसेच, केंद्र सरकारच्या योजनेतून पीएमपीला ३०० ई-बस मिळणार आहेत. तसेच, पुणे व पिंपरी चिंचवडमहानगरपालिकांच्या माध्यमातून ३०० बसेस महामंडळास मिळणार आहेत. यामध्ये भाडेतत्त्वावर १०० ई-बसेस व२०० सीएनजी बसेस असतील.’ या बैठकीमध्ये पीएमपी कर्मचारी, खासगी बस पुरवठादार व सीएनजी पुरवठादार एमएनजीएल यांच्या प्रलंबित प्रश्नावर समाधानकारक तोडगा निघाल्याचे पाटील यांनी सांगितले.

PMP Bus
Exam Paper Reevaluation : निकालाआधीच द्यावी लागणार ‘परीक्षा'! विद्यार्थ्यांमध्ये संताप

कर्मचाऱ्यांना सातवा वेतन आयोग

  • पुणे महानगर परिवहन महामंडळाच्या कर्मचाऱ्यांना जानेवारीपासून लागू करण्यात आलेला ५० टक्के सातवा वेतन

  • आयोग, येत्या जुलै पासून संपूर्ण लागू करण्यात येणार आहे. या निर्णयामुळे सातव्या वेतन आयोगातील ५० टक्के

  • फरकाची रक्कम त्यांच्या बँक खात्यात लवकरच जमा होण्यास सुरूवात होणार आहे. त्यासाठी महिन्याला चार कोटी रुपये

  • लागणार आहेत. दरम्यान पीएमटी कामगार संघटनेने (इंटक) पालकंत्र्यांच्या घोषणेचे स्वागत केले असून, अंमलबजावणी लवकर व्हावी, अशी अपेक्षा संघटनेचे अध्यक्ष राजेंद्र खराडे यांनी व्यक्त केली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.