पुणे : लॉकडाउनच्या काळात ऑनलाईन बैठका, चर्चासत्रे, शिकविण्या आदींसाठी झूम ऍपचा मोठ्या प्रमाणावर वापर वाढला आहे. परंतू माहिती चोरी जाण्याच्या प्रकारामुळे त्यावरील विश्वासार्हताही कमी झाली. देशाची गरज बघता पुण्यातील युवकांनी "वेबीनार' नावाचा ऑनलाईन बैठकांसाठी स्वदेशी पर्याय विकसित केला आहे. एकाच वेळी 500 लोकांना संवाद साधता येणारी ही सुविधा www.vebinarr.com या संकेतस्थळावर मोफत उपलब्ध करून देण्यात आली आहे.
पुण्याच्या बातम्या वाचण्यााठी येथे ► क्लिक करा
अभियांत्रिकीचे विद्यार्थी हिमांशू रत्नपारखी यांच्या नेतृत्वामध्ये अवध जोशी, कविता जगताप, निरंतर पांड्या, पूजा सी. या चमूने ही कामगिरी बजावली. रत्नपारखी म्हणाला,""सध्या पर्याय उपलब्ध नसल्यामुळे अगदी प्रशासनापासून सामान्य माणसांपर्यंत सर्वच झूमचा वापर करत आहे. परंतु विदेशी कंपनीच्या या ऍपमूळे माहिती चोरीचा धोका जास्त आहे. यावर पर्याय म्हणून आम्ही हे संकेतस्थळ विकसित केले आहे. तसेच सामान्य व्यक्तीला सहज वापरता येईल अशा प्रकारची रचना आम्ही विकसित केली आहे.'' केंद्र सरकारच्या वतीने ऑनलाईन बैठकांसाठी नवीन पर्याय विकसित करणाऱ्या स्पर्धेतही वेबीनारच्या या टीमने सहभाग घेतला आहे.
वेबीनारची वैशिष्ट्ये
- एकाच वेळी 500 लोकांची व्हिडिओ आणि ऑडिओ कॉन्फरन्स शक्य
- बैठकीतच तुम्हाला समोरच्यांना काही लिहून दाखवायचे असल्यास "व्हाईट बोर्ड'ची सुविधा
- तुम्ही यु ट्यूब वरील व्हिडिओ सुद्धा दाखवू शकतात
- लाईव्ह स्क्रीन शेअरींग फॅसिलिटी
- तुम्हाला दिसणारे ले-आउटही बदलू शकता
- 11 आंतरराष्ट्रीय भाषांमध्ये उपलब्ध
- ऑडिओ नोटिफिकेशन
- ऑनलाईन मतदान चाचणी, प्रश्नोत्तरे घेणे शक्य
वेबीनारची मर्यादा
एकाच वेळी दोन ते तीन समांतर बैठका या संकेतस्थळाच्या माध्यमातून चालू शकतात. एकाच वेळी जास्तीत जास्त बैठका चालतील यासाठी आम्ही आवश्यक बदल करत आहोत, अशी माहिती रत्नपारखी यांनी दिली. वेबीनारची कार्यक्षमता मोठ्या प्रमाणावर वाढविण्यासाठी काही तात्रिंक कामासाठी आर्थिक गुंतवणूक करावी लागणार आहेत. तसेच त्यासाठी स्वतंत्र ऍपही आम्ही विकसित केले आहे. आम्हाला इतर साहाय्य मिळाल्यास आम्ही लवकरच ते बाजारात घेऊन येऊ असेही रत्नपारखी यांनी सांगितले.
कसे वापराल
संकेतस्थळावर जाऊन ई-मेलच्या सहाय्याने आपली नोंदणी करणे गरेजेचे आहे. त्यानंतर नवीन मिटींग सुरू करा किंवा सहभागी व्हा. सहभागी होण्यासाठी मिटिंगसाठीचा विशिष्ट क्रमांक तूम्हाला दिलेल्या रकाण्यात टाकता येईल. तसेच, फिचरमध्ये जाउन व्हाईट बोर्ड, युट्यूब त्यात वापरु शकतात.
झूम पेक्षा वेबीनार सुरक्षीत का ?
"झूम'मध्ये तुमचा व्हिडीओ कॉल रेकॉर्ड केला जातो. मात्र वेबीनारमध्ये तुमच्या परवाणगी शिवाय तो रेकॉर्ड होत नाही. पर्यायाने तुमची माहीती तुमच्या हातात असते. तसेच, वापरण्यासाठी सुटसुटीत असल्यामूळे टेक्नोसॅव्ही नसलेली व्यक्तीही वेबीनार वापरु शकते.
पुण्याच्या बातम्या वाचण्यााठी येथे ► क्लिक करा
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.