New Year Celebration Guideline : तब्बल दोन वर्षानंतर निर्बंधमुक्त नवं वर्ष साजरं होणार असल्याने नव्या वर्षाची जय्यत तयारी सगळीकडे सुरू आहे. मात्र नव्या वर्षाचं स्वागत करत असताना तुम्हाला नियमांचं पालक करणेही गरजेचे आहे. यावेळी मद्यप्राशन करून अनेक लोक वाहने पळवतात. दुर्घटना घडू नये यासाठी काही निर्बंध लावण्यात आले आहे. ते कोणते ते आपण जाणून घेऊया.
शहरातील १७ संवेदनशिल ठिकणांची यादी वाहतूक पोलिसांनी जाहीर केली आहे
हडपसर
मुंढवा
कोंढवा
चंदननगर
येरवडा
सिंहगड रस्ता
वारजे
गणेशखिंड रस्ता
बाणेर येथील हाय स्ट्रीट
एमजी रोड
एफसी रोड
टिळक आणि कर्वे रोड
यावेळी दंगा करणाऱ्यांवर दंड वसूल करण्यात येणार आहे. प्रमाणापेक्षा जास्त मद्यप्राशन केले असल्यास संबंधितांचे वाहनही ताब्यात घेतले जाणार असल्याची माहिती अधिकाऱ्यांनी दिली आहे. (Happy New Year)
नव्या वर्षात अनेकजण बाहेर जेवण करण्यासाठी जातात तेव्हा परमिट रूम, बार, रेस्टॉरंट रविवारी पहाटे ५ पर्यंत सुरू राहील. तसेच आज वाहतूक नियमन करण्यासाठी अधिकारी आणि कर्मचारी असे एकूण साडेसातशे कर्मचारी तैनात असणार आहेत.
कोणी रस्त्यावर त्रास दिल्यास पोलिसांनी १०० नंबर वर कॉल करण्याचे आव्हानही लोकांना दिले आहे. तसेच ब्रीथ अॅनालायझरच्या मदतीने मद्यपिंवर कारवाई करण्यात येणार आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.