Pune Crime News : चाकण परिसरात पिस्तूलराज आलंय का?

पिंपरी -चिंचवड पोलीस आयुक्तालयाच्या हद्दीतील चाकण,महाळुंगे, आळंदी या पोलीस ठाण्यात पिस्तूल बाळगल्याचे गुन्हे दिवसेंदिवस दाखल होत आहेत. चाकण,महाळुंग्यात पिस्तूल, गावठी कट्टे बाळगल्याचे गुन्हे वारंवार घडत आहेत.
Pune Crime News
Pune Crime Newssakal
Updated on

चाकण : पिंपरी -चिंचवड पोलीस आयुक्तालयाच्या हद्दीतील चाकण,महाळुंगे, आळंदी या पोलीस ठाण्यात पिस्तूल बाळगल्याचे गुन्हे दिवसेंदिवस दाखल होत आहेत. चाकण,महाळुंग्यात पिस्तूल, गावठी कट्टे बाळगल्याचे गुन्हे वारंवार घडत आहेत. दर आठवड्याला हे गुन्हे दाखल होत आहेत.पोलीस आयुक्तालयाच्या या पोलीस ठाण्यात कोयता, तलवार आणि पिस्तूलराज सर्रास सुरू आहे. यामुळे गुन्हेगा रांची एक वेगळी दहशत निर्माण होत आहे. त्या दहशतीमुळे नागरिक, व्यवसायिक,उद्योजक भयभीत होत आहेत हे वास्तव आहे. चाकण परिसरात औद्योगिक वसाहतीत पिस्तूल राज आलेय का अशीही चर्चा होत आहे.

पिंपरी -चिंचवड पोलीस आयुक्तालयात चाकण, आळंदी महाळुंगे पोलीस ठाणे गेल्यानंतर या परिसरात गुन्हेगारी वाढली की कमी झाली हा चिंतनाचा तसेच अभ्यासाचा विषय आहे. जिल्हा ग्रामीण पोलीस असताना गुन्हेगारी जेमतेम होती .त्यावर जिल्हा पोलीस अधीक्षकांच्या मार्फत वचक होता असेही म्हटले जाते. जिल्हा ग्रामीण पोलीसात पोलीस ठाणी असताना कमी पोलिसात गुन्हेगारावर कारवाई होत होती असेही काहीजण म्हणतात.

पिंपरी -चिंचवड पोलीस आयुक्तालय आल्यानंतर चाकण,महाळुंगे ही दोन स्वतंत्र पोलीस ठाणी झाली.कर्मचारी, अधिकारी वाढले तरी गुन्हेगारी कमी होत नाही असाही सवाल काही राजकीय नेते, नागरिक, उद्योजक करतात. गुन्हेगारी नेमकी किती वाढली आणि का वाढत आहे हा अभ्यासाचा विषय आहे. पोलीस अधिकारी म्हणतात गुन्हेगारी रोखण्यासाठी आम्ही प्रयत्न केले, तडीपारी,मोका कारवाया केल्या.

परंतु दिवसेंदिवस तरुणांमध्ये पिस्तूल बाळगण्याचे आणि कोयता, तलवार आदी घातक हत्यारे बाळगण्याचे प्रकार या परिसरात का घडत आहेत असाही सवाल नागरिक, व्यवसायिक,उद्योजक करत आहेत. औद्योगिक वसाहतीमुळे परिसरात उत्तर प्रदेश,मध्यप्रदेश,बिहार, पश्चिम बंगाल, राजस्थान, पंजाब या राज्यातील काही कामगार राहत आहेत. बहुतांश कामगार भाड्याने खोलीत राहतात. कामगाराबरोबर काही जण राज्यातील तसेच मध्यप्रदेश,बिहार, उत्तरप्रदेश, राजस्थान, पंजाब, झारखंड, छत्तीसगड या राज्यात गुन्हेगारी करून आलेले नामचीन गुन्हेगारही चाकण, महाळुंगे, नाणेकरवाडी,खराबवाडी,भांबोली, सावरदरी, आंबेठाण,वासुली, खालुंब्रे, चिंबळी, कुरुळी, निघोजे या औद्योगिक वसाहतीच्या परिसरात वास्तव्यास आहेत. त्यामुळे हा परिसर दिवसेंदिवस गुन्हेगारीचा होत आहे.

Pune Crime News
Pune Crime News : सराफा व्यावसायिकांकडून दागिने व पैशाचा अपहार ; वाडेबोल्हाई येथील प्रकरण

चाकण,महाळुंगे परिसरात मोठ्या प्रमाणात भाड्याच्या खोल्या आहेत.या भाड्याच्या खोलीत पर राज्यातील गुन्हेगार बिनदीक्कतपणे राहतात.परराज्यातून गावठी कट्टे,पिस्तूल,जिवंत काडतूसे घातक हत्यारे सर्रास विक्रीसाठी आणली जातात. अगदी पाच, दहा हजार रुपयात ही घातक हत्यारे मिळतात.येथील काही तरुण, गुंड, गुन्हेगार, काही राजकीय पक्षाचे कार्यकर्ते ते विकत घेतात. पिस्तूल, गावठी कट्टे येथे काही तरुणांकडे सर्रास आढळत आहेत. कार मध्ये गावठी कट्टे,पिस्तूल ठेवले जातात.काही तरुण, गुंड औद्योगिक वसाहतीत तसेच परिसरात गावठी कट्टे,पिस्तूल घेऊन सहजपणे फिरतात. काही जणांवर पोलीस कारवाई करतात, पण काही जण असे सराईता सारखे वागतात. त्यातून दमदाटी,खंडणी, हप्ते मागणे असे प्रकार वारंवार घडत आहेत.

घातक शस्त्र,हत्यारे बाळगणारे सापडत असल्याने या परिसरात पिस्तूलराज आहे का असाही प्रश्न निर्माण होत आहे. बेकायदा विनापरवाना शस्त्र मोठ्या प्रमाणात बाळगली जातात.यामध्ये पिस्तूल,कोयता,तलवार आदी घातक हत्यारे बाळगली जातात. औद्योगिक वसाहतीतील काही गावात रस्त्याने काही तरुण दुचाकीवरून तलवारी घेऊनही फिरतात. पण त्यांच्यावर कारवाई होते का हाही प्रश्न निर्माण होतो.

परिसरात बेकायदा पिस्तूल, कोयता, तलवारी बाळगणाऱ्यांची संख्या मोठी आहे. त्यावर नियंत्रण येणे गरजेचे आहे. काही गुन्हेगारांचे काही तरुणांचे आणि पोलिसांचे सबंध आहेत हे भयानक वास्तव आहे. काही हॉटेलात,ढाब्यावर गुन्हेगार, पोलीस अशाही पार्ट्या रंगल्या जातात.काही पोलीस काही गुन्हेगारांचे काही तरुणांचे जवळचे मित्र आहेत हे वास्तव आहे.त्यामुळे गुन्हेगारीवर वचक बसणे अवघड आहे. राज्याच्या गृह विभागाने याकडे लक्ष देणे गरजेचे आहे. खेड तालुक्यातील एका राजकीय नेत्याने तालुक्यात मोठ्या प्रमाणात गावठी कट्टे, पिस्तूल बाळगणारे काही तरुण आहेत.त्यामुळे धोकादायक परिस्थिती आहे असे म्हंटले होते.

पिंपरी -चिंचवडचे चे पोलीस आयुक्त विनयकुमार चौबे यांनी सांगितले की," पिंपरी- चिंचवड आयुक्तालयाच्या हद्दीतील चाकण,महाळुंगे परिसरामध्ये घातक शस्त्र, हत्यारे बाळगणाऱ्यांवर पोलिसांकडून कारवाई करण्यात येत आहे. त्यामुळे काही लोकांकडून घातक, शस्त्र, हत्यारे जप्त होत आहेत. ही कारवाई वाढवण्यात येणार आहे. औद्योगिक वसाहतीत जे गुंड, गुन्हेगार लोकांना त्रास देत आहेत त्यांच्यावरही कारवाई करण्यात येत आहे.जे हप्ता, खंडणी मागतात त्यांच्यावरही तात्काळ कारवाई करण्यात येत आहे. नागरिकांनी,उद्योजकांनी पुढे येऊन तक्रारी देणे गरजेचे आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.