राष्ट्रीय तपास यंत्रणा म्हणजे NIAने रविवारी पुण्यातल्या एका शाळेतले दोन मजले जप्त केले आहेत. या ठिकाणी पॉप्युलर फ्रंट ऑफ इंडियातर्फे मुस्लिम तरुणांना कट्टरपंथीय बनवण्यासाठी शिबिरं घेतली जात होती, तसंच हल्ल्यांसाठी प्रशिक्षण देत होती, असा दावा NIA ने केला आहे.
ब्लू बेल स्कूल बिल्डिंगच्या चौथ्या आणि पाचव्या मजल्याचा वापर PFI द्वारे दहशतवादी कारवाया करण्याची योजना आखण्यासाठी आणि तयारी करण्यासाठी करण्यात आला. PFI मुस्लिम तरुणांना भरती करत होते आणि 2047 पर्यंत देशात इस्लामिक राजवट स्थापन करण्यास विरोध करणाऱ्यांना संपवण्यासाठी वा हल्ला करण्यासाठी त्यांना सशस्त्र आणि नि:शस्त्र प्रशिक्षणही देत होते.
एनआयएने गेल्या वर्षी २२ सप्टेंबर रोजी शाळेच्या आवारातल्या दोन मजल्यांची झडती घेतली होती. जप्त केलेल्या काही दस्तऐवजांनुसार या मालमत्तेचा वापर आरोपींनी केडरसाठी शस्त्र प्रशिक्षण देण्यासाठी केल्याचं आढळून आलं.
नव्याने भरती झालेल्या PFI कॅडरना भारतात इस्लामिक राजवट प्रस्थापित करण्याच्या संघटनेच्या विचारसरणीला विरोध करणार्या प्रमुख नेत्यांवर हल्ला करण्यासाठी आणि त्यांची हत्या करण्यासाठी चाकू, विळा इत्यादी धोकादायक शस्त्रे वापरण्याचे प्रशिक्षण देण्यात आलं.
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.