Pune Crime : एनआयएचे पुण्यासह मध्यप्रदेशात छापे

दहशतवादी संघटना असलेल्या इस्लामिक स्टेट खोरासान प्रांतशी (आयएसकेपी) संबंधित चार ठिकाणी राष्ट्रीय तपास संस्थेने (एनआयए) छापे टाकले.
NIA raid
NIA raidsakal
Updated on
Summary

दहशतवादी संघटना असलेल्या इस्लामिक स्टेट खोरासान प्रांतशी (आयएसकेपी) संबंधित चार ठिकाणी राष्ट्रीय तपास संस्थेने (एनआयए) छापे टाकले.

पुणे : दहशतवादी संघटना असलेल्या इस्लामिक स्टेट खोरासान प्रांतशी (आयएसकेपी) संबंधित चार ठिकाणी राष्ट्रीय तपास संस्थेने (एनआयए) छापे टाकले. या कारवार्इ एनआयएच्या पथकाने पुणे तसेच मध्यप्रदेशातील सिवोनी जिल्ह्यातील दोन संशयितांना ताब्यात घेतले आहे. एनआयएच्या पथकाकडून त्यांची चौकशी करण्यात येत आहे.

पुण्यात तलहा खान आणि मध्यप्रदेशातील सिवोनी गावातील अक्रम खान यांच्या घरी एनआयएच्या पथकाने छापे टाकले. दिल्लीतून काश्मिरी दांपत्य जहाँजेब वाणी आणि त्याची पत्नी बशीर बेग यांना दिल्ली पोलिसांच्या विशेष पथकाने (स्पेशल सेल) अटक केली होती.

NIA raid
Mumbai Crime News : संतापजनक! १७ वर्षीय मुलीवर दोन नराधमांकडून अत्याचार

वाणी दांपत्य इस्लामिक स्टेट खोरासान प्रांत या दहशतवादी गटाशी संबंधित असल्याची माहिती तपासात मिळाली होती. तसेच या प्रकरणात तिहार कारागृहात असलेला आरोपी अब्दुल बशीथ संशयित असल्याची माहिती मिळाली. त्यानंतर मध्यप्रदेशातील सिवोनी येथे छापे टाकण्यात आले होते. तेथे अब्दुल अजीज सलाफी आणि शोएब खान यांची चौकशी करण्यात आली.

अफगाणिस्तानात रचलेल्या कट प्रकरणात आरोपी महम्मद शरीक, माझ मुनीर खान, यासीन आणि अन्य आरोपी परदेशातील सूत्रधारांच्या सूचनेनुसार देशात घातपाती कारवाया करण्याच्या तयारीत होते. त्यांना आभासी चलनाच्या माध्यमातून निधी उपलब्ध करून देण्यात आला होता.

NIA raid
Satara Crime News: सोने लुटणाऱ्या दोघा बिहारींना अटक

आरोपी महम्मद सरीकने स्फोट घडवून आणण्याचा कट गेल्या वर्षी नोव्हेंबर महिन्यात आखला होता. मात्र, वाटेत बाँबचा स्फोट झाला झाला होता. मध्य प्रदेश, महाराष्ट्रासह दक्षिण भारतातील तरुणांना दहशतवादी कारवायांमध्ये सामील करून घेण्यासाठी दहशतवादी गटांकडून प्रयत्न सुरू होते. त्या अनुषंगाने ही कारवार्इ करण्यात आली आहे.

NIA raid
Pune Crime : धक्कादायक! भर रस्त्यात चुंबन घेतलं अन् म्हणाला लग्न कर नाही तर...तरुणावर गुन्हा दाखल

तरुणांना दहशतवादी कारवायांमध्ये सहभागी करून घेण्याची प्रयत्न :

मध्यप्रदेशातील सिवोनी जिल्ह्यातील तरुणांना एकत्र आणून त्यांच्याकडून दहशतवादी कारवाया करून घेतल्या जाणार होत्या. एनआयएच्या पथकाने शोधमोहिम राबवून काही साहित्य जप्त केले. अफगाणिस्तानसह देशात सक्रिय असलेल्या विविध दहशतवादी गटांचे काम सोशलमीडियाच्या माध्यमातून व्हायरल केले जात आहे. त्यामाध्यमातून तरुणांना दहशतवादी कारवायांमध्ये सहभागी करून घेतले जात असल्याची माहिती एनआयएला मिळाली होती. त्यानुसार ही कारवार्इ करण्यात आली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.