उपमुख्यमंत्री अजित पवार आपल्या मिश्किल पण रोखठोक शैलीसाठी प्रसिद्ध आहेत. कोणत्याही कार्यक्रमात गेले, तरी अजित पवार कोणाला ना कोणाला तरी एखादा टोला लगावतातच किंवा थट्टा-मस्करी करतातच. आजही त्यांनी आपली मिश्किल शैली दाखवून दिली. या कार्यक्रमात अजित पवार आणि निलम गोऱ्हे यांच्यात चांगलीच जुगलबंदी पाहायला मिळाली. (Ajit Pawar on Nilam Gorhe in Pune)
पुण्यात पहिल्या इलेक्ट्रिक बसचा लोकार्पण सोहळा आज पार पडला. या कार्यक्रमासाठी उपमुख्यमंत्री अजित पवार (Deputy CM Ajit Pawar) आणि विधानपरिषदेच्या उपसभापती निलम गोऱ्हेही (Nilam Gorhe) उपस्थित होते. यावेळी अजित पवारांच्या कार्यक्रमाला लवकर येण्याच्या सवयीवरून अजित पवारांना टोला लगावला. गोऱ्हे म्हणाल्या की, मी विचार करतेय की तुमचा जेव्हा पुण्यात कार्यक्रम असतो, तेव्हा आयोजकांना सांगावं की आमची झोपायची व्यवस्था इथंच करा. आम्ही तुमच्या आधी कितीही लवकर यायचा प्रयत्न केला, तरी तुम्ही आधीच हजर असता. नऊच्या कार्यक्रमाला पावणे नऊला आलं, तरी अजितदादा साडे आठलाच आलेले असतात.इतके कार्यक्षम ते आहेत. पण याचा अर्थ आम्ही उशिरापर्यंत झोपतो, असं नाही.
निलम गोऱ्हेंच्या याच टोल्याला अजित पवारांनीही जशास तसं उत्तर दिलंय. अजित पवार म्हणाले, "मी इथं लवकर आलो, पण नऊ वाजेपर्यंत तुमच्यासाठी थांबायचं ठरलं होतं. म्हणून आम्ही गोल करून गप्पा मारत बसलो. अनिल परबसुद्धा (Transport Minister Anil Parab) सोबत होते. निलमताई तुम्ही वेळेत कार्यक्रमाला आलात. आम्ही तुमच्या साठी थांबलेलो, पण परब साहेबांनीच कार्यक्रम सुरू करायला सांगितलं. मी त्यांना म्हणालोही की निलमताई येतील, त्या उपसभापती आहेत, आपण थांबायला पाहिजे. पण परबसाहेबांनी ऐकलं नाही. आता ते शिवसेनेचे तुम्ही शिवसेनेचे तुमचं तुम्ही बघून घ्या".
अजित पवार आणि निलम गोऱ्हे यांच्यातल्या या जुगलबंदीने उपस्थितांमध्ये एकच हशा पिकला.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.