पुणे : कोरोनाच्या संकटाला तोंड देण्यासाठी पुन्हा एकदा सज्जनशक्ती, समाजशक्ती संघटित करण्याची गरज लक्षात घेऊन राष्ट्रीय स्वयंसेवक संघाने ‘समर्थ भारत पुनर्बांधणी योजने’ची सुरवात करण्यात आली आहे. यात पुणे शहरातील नऊ विभागात कोविड केअर सेंटर सुरू केली जाणार आहेत. तसेच कौशल्य शिक्षण, समुपदेशन आदी उपक्रम राबविले जाणार आहे.
अकोला जिल्ह्यातील बातम्यांसाठी क्लिक करा
समाजाने समाजासाठी चालविलेल्या या उपक्रमात समाजाच्या विविध क्षेत्रातील मान्यवरांचा सहभाग आहे, गरजू नागरिकांनी या योजनेचा लाभ घेण्याचे आवाहन राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे पुणे महानगराचे संघचालक रवींद्र वंजारवाडकर यांनी केले आहे. ऑनलाइन झालेल्या या पत्रकार परिषदेत समर्थ भारत पुनर्बांधणी आणि कोविड केअर सेंटरची सविस्त माहिती देण्यात आली. रा.स्व. संघ पुणे महानगराचे कार्यवाह महेश करपे, सहकार्यवाह सचिन भोसले आणि विश्व संवाद केंद्राचे अध्यक्ष मनोहर कुलकर्णी, राजीव सहस्रबुद्धे हे उपस्थित होते.
- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा
भोसले यांनी सांगितले की, ''समर्थ भारत पुनर्बांधणी योजनेचे तीन स्तर करण्यात आले असून, यामध्ये मार्गदर्शक मंडळात बाबा कल्याणी, आनंद देशपांडे, सुधीर मेहता, प्रमोद चौधरी, रितू छाब्रिया, स्वाती मुजूमदार, लीना देशपांडे, अनिल गुजर, प्रदीप लोखंडे या उद्योग, माहिती तंत्रज्ञान, शिक्षण, सामाजिक क्षेत्रातील दिग्गज मान्यवरांचा सक्रिय सहभाग आहे. या योजनेच्या नियोजन, सुसूत्रीकरण, समन्वयासाठी महानगर सुकाणू समिती व क्रियान्वयन, अंमलबजावणीसाठी भाग कार्यकारी समिती अशी त्रिस्तरीय रचना करण्यात आली आहे. या त्रिस्तरीय रचनेबरोबरच विविध स्वयंसेवी संस्था, साधन संस्था, धर्मादाय सेवा संस्था, समाज समूह, शासन प्रशासन यांचा स्थानिक स्तरावरील समन्वय साधून हे काम सुरू आहे. समाजातील सर्व व्यक्ती, संघटना व संस्था एकत्र येऊन, आवश्यक कार्यविभागणी व परस्परपूरकतेने ही योजना कार्यान्वित झाली आहे.''
या योजनेत कौशल्य विकास व प्रशिक्षण, औद्योगिक, आरोग्य, शिक्षण, समुपदेशन या पाच गटात ही योजना राबविली जाणार आहे. आर्थिक, सामाजिक सर्वेक्षण, गरजू घटकांची व स्वयंसेवकांची नोंदणी केली जात असून, पहिल्या गटात कौशल्य देणाऱ्या संस्थांशी जोडणी करणे व लॉकडाऊन संपल्यानंतर प्रशिक्षण योजना राबविणे असा उद्देश आहे. आजपर्यंत अशा 26 संस्थांशी जोडणी झाली आहे. दुसऱ्या औद्योगिक गटात कुटीर, लघु, मध्यम उद्योगांसाठी रोजगार जोडणी - राबविणे असा आहे. यात नोकरी गमाविलेल्या 450 जणांनी रोजगार पाहिजे म्हणून तर कामगार, कर्मचारी हवेत यासाठी 66 कंपन्याची नोंदणी केली आहे. तिसऱ्या आरोग्य गटात वस्ती आरोग्य रक्षण, आरोग्य यंत्रणेशी समन्वय, प्रबोधन, कोविड केअर सेंटर अशा उपक्रमांचा समावेश असून त्यातील पहिले कोविड केअर सेंटर गरवारे महाविद्यालयाच्या वसतीगृहात सुरू झाले आहे. पुणे महानगराची लोकसंख्या लक्षात घेता पाच लाख लोकसंख्येसाठी एक कोविड केअर सेंटर अशा अंदाजाने नऊ कोविड केअर सेंटर उभारणीचे नियोजन आहे. चौथ्या गटात शिक्षण क्षेत्रातील गरज लक्षात घेऊन स्क्रीनशिवाय शिक्षण, सह्याद्री टीव्हीवर टिलीमिली शैक्षणिक कार्यक्रमाचे जनजागरण, जिथे गरज आहे अशांना मोबाईलची उपलब्धता, शैक्षणिक शुल्क व साहित्य भरण्यासाठी भरीव मदत करणे अशा प्रयत्नांचा सहभाग आहे, तर पाचव्या गटात कोरोना आपत्तीमध्ये मानसिक स्वास्थ बाधीत झालेल्या नागरिक व कुटुंबासाठी समुपदेशन केंद्र सुरू करण्यात आली आहे. त्यात समुपदेशक मानसिक, भावनिक आधार देण्याचे काम करीत आहेत.
उद्योग क्षेत्रात उपलब्ध असलेल्या नोकऱ्यांचा भूमिपुत्रांनी लाभ घ्यावा - उद्धव ठाकरे
योजनेचा लाभ घेण्यासाठी वा अधिक माहितीसाठी ८७६७५२८७४३ या मोबाईल क्रमांकावर किंवा samarthabharatpune@gmail.com या मेल आयडीवर संपर्क करावा, असे आवाहन करण्यात आले आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.