दौंड : बिबट्याची दहशत; वनाधिकाऱ्यांसमोर ग्रामस्थांनी सोडला अश्रूंचा बांध

nine goats killed in leopard attack in devkarwadi
leopard
leopard Sakal Media
Updated on

राहू : देवकरवाडी-मगरवाडी (ता. दौंड) हद्दीत शनिवारी (ता. १५) मध्यरात्रीच्या सुमारास मिरवडी (ता. दौंड) येथील मेंढपाळ संपत सोमा थोरात, दादा सोमा थोरात यांच्या वाडयावर बिबट्याने केलेल्या हल्यात नऊ शेळ्या ठार तर एक मेंढी फस्त झाली. बिबट्याचा वावर परिसरात वाढल्याने नागरिकांमध्ये भितीचे वातावरण पसरले आहे.

leopard
पुणे : ग्रामीण प्रशासनाने कोविडबाबत सतर्क रहावे : गृहमंत्री

सुमारे दोन लाख रूपयांचे आमचे नुकसान झाले असून वनविभागाकडून नुकसान भरपाई मिळण्याची मागणी मेंढपाळ संपत थोरात, दादा थोरात यांनी केली. थोरात यांचा शेळ्या मेढ्यांचा वाडा चरण्यासाठी मगरवाडी परिसरात मुक्कामी होता. परिसरात बिबटयाचा वावर वाढलेला असून तातडीने पिंजरा लावून बिबटयाचा बंदोबस्त करण्याची मागणी माजी सभापती मारूती मगर, मिरवडीचे सरपंच सागर शेलार, देवकरवाडीचे सरपंच दिलीप देवकर, दहिटण्याचे सरपंच बापूराव कोळपे, माजी सरपंच बाळासाहेब शिंदे, भीमा थोरात यांच्यासह ग्रामस्थांनी केली.

वनविभागाच्या अधिका-यांनी शेळ्यांचे शवविच्छेदन करून पुढील अहवाल वनविभागाच्या वरिष्ठ कार्यालयाकडे पाठवला असल्याचे वनरक्षक शिवकुमार बोंबले, वनपाल पवार, नाना चव्हाण यांनी सांगितले. बिबटयाने शेळ्यांवर हल्ला करून मोकळ्या शेतात फरफटत नेले. परिसरातील अनेक कुत्र्यांवर हल्ले करून त्याने फडशा पाडला होता. देवकरवाडी, मगरवाडी, दहिटणे, मिरवडी परिसरात उसाचे, वनविभागाचे अधिक क्षेत्र असल्याने बिबट्याला लपायला अधिक वाव मिळतो. परिसरात बिबट्याचा वावर वाढल्याने नागरिक भयभीत झाले आहेत. बिबट्याच्या दहशतीमुळे रात्रीच्या वेळी शेतकरी शेतातील पीकांना पाणी द्यायला जात नसल्याची परस्थिती आहे. रात्रीच्या वेळी शेतात एकटे न जाता समुहाने जा, फाटके वाजवा. बॅटरीचा उजेड करा. बिबटया अचानक दिसल्यास पाठलाग करू नका, असे आवाहन वनविभागाच्या वतीने ग्रामस्थांना करण्यात आले.

leopard
सासवड : आधीच कोरोनाचा कहर आता पाणीसंकट

...अन् अश्रूचा बांध फुटला-मिरवडी येथील संपत थोरात, दादा थोरात यांच्या वाड्यावर बिबट्याने केलेल्या हल्यात नऊ शेळया, एक मेंढी फस्त केली. सुमारे दोन लाख रूपयांचे नुकसान झाले. आर्थिक परस्थिती हलाखीची आहे. वनविभागाचे अधिकारी पंचनामा करण्यासाठी घटनास्थळी आल्यावर माहिती विचारताक्षणी थोरात बंधू त्यांच्या कुटूंबाला अश्रू आवरता आले नाही. हे बघा साहेब आमंच लय मोठं नुकसान झालंय तेवढं सायब पोटच्या पोरांबाळाप्रमाणे आम्ही शेळ्या, मेंढया जपल्या आहेत. आम्हाला लवकरात लवकर नुकसान भरपाई मिळून द्या. अशी केविलवाणी विनंती करताना त्या कुटूंबाला हुंदके (रडू) आवरता येत नव्हते.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()