नऊ वर्षांच्या स्वानंदीचा  रॅपलिंग थरार 

kobal1.jpeg
kobal1.jpeg
Updated on


हरिश्‍चंद्र गडावरील कोकण कडा सर; शरद पवारांच्या वाढदिवसानिमित्त फत्ते केली मोहीम 

पुणे ः ज्या ठिकाणाहून फक्त पाण्याचा प्रवाहच खाली जाऊ शकतो, अशी रायगडावरील अवघड उतरण उतरून हिरकणीने महिलांमधील धाडसी वृत्ती समोर आणली. तिच्यापासून प्रेरणा घेऊन वेगवेगळ्या क्षेत्रांत आपल्या धाडसी वृत्तीचा ठसा उतरविण्याचा प्रयत्न अनेक मुलींकडून केला जात आहे. शरद पवार यांची चाहती असलेल्या अवघ्या नऊ वर्षांच्या कु. स्वानंदी सचिन तुपे या विद्यार्थिनीने त्यांच्या वाढदिवसानिमित्त दोन दिवसांत खिरेश्‍वर, हरिश्‍चंद्रगड ते कोकणकडा अशी साहसी मोहीम फत्ते केली. 

लोणी काळभोर कुंजीरवाडी येथे राहणारी स्वानंदी एमआयटी शाळेत चौथीच्या वर्गात शिकत आहे. वयाच्या पाचव्या वर्षांपासून तिने आत्तापर्यंत सह्याद्री रांगेतील अनेक गड-किल्ले सर केले आहेत. लिंगाणा या अत्यंत अवघड श्रेणीतील समजला जाणाऱ्या गडासह रायगड, रायरेश्वर, केंजळगड, राजगड, तोरणा, लोहगड, विसापूर, राजमाची असे महत्त्वाचे समजले जाणारे गड-किल्ले तिने सर केले आहेत. तिचे वडील सचिन तुपे व काका पंडित झेंडे यांच्याबरोबर तिची ही सह्याद्रीच्या कडेकपारी व गडकोटावरील भटकंती नियमित सुरू आहे. 
नऊ डिसेंबरला खिरेश्‍वर येथून सायंकाळी सहा वाजता तिने हरिश्‍चंद्रगड चढण्यास सुरवात केली. रात्री साडेनऊ वाजता ती गडावर पोचली. तेथे रात्रीचा मुक्काम करून दुसऱ्या दिवशी 10 डिसेंबरला पहाटे कोकण कड्यावर पोचली. सकाळी नऊ- साडेनऊच्या दरम्यान ती व तिचे वडील सचिन तुपे यांनी कोकण कड्यावरून रॅपलिंग करायला सुरवात केली. पहिला नऊशे फुटांचा टप्पा पार करायला तिला अर्धा तास लागला. हा टप्पा पूर्ण करताना लटकत खाली जावे लागते. त्यानंतर सहाशे फुटांचा दुसरा टप्पा आहे. तो तिने दहा मिनिटांत पार केला. हाही टप्पा तसेच लटकत पार केला. तिसरा टप्पा तीनशे फुटांचा आहे. हा टप्पा सोपा आहे, तिने तो आठ मिनिटांत पार केला. 

येथून पुढे बेलपाडापर्यंत जाणारी वाट अतिशय अवघड आहे. मोठमोठ्या दगडांची वाट पार करून जावे लागले. तिथे वाट अशी नाहीच, अंदाज घेत दगडांवर पाय ठेवून जिथे वाट दिसेल तेथे पाय रोवून जावे लागत होते. अतिशय कष्टदायक व सत्त्वपरीक्षा पाहणारी वाट चालून जवळपास साडेपाच तासांचे पदभ्रमण करून रात्री साडेनऊ वाजता बेलपाडा येथे ती पोचली. 

या मोहिमेचे आयोजन अनिल वाघ याने केले. त्याच्या बरोबर दीपक विशे, गणेश गायकवाड यांनी अनिलला साथ दिली. एकूण दहा सदस्यांनी 1800 फुटांचा टप्पा रॅपलिंग करीत कोकण कडा पार करीत मोहीम फत्ते केली. 
 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.